Maval Zilla Parishad Election: प्रचार विरुद्ध भावनिक आवाहन, ‘पर्चेस व्होटिंग’ची चर्चा

भाजपचा प्रचार जोरात, राष्ट्रवादीचे भावनिक राजकारण; अखेरच्या टप्प्यात पैशांचा फंडा प्रभावी ठरण्याची शक्यता
Election Candidate Money
Election Candidate MoneyPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागांसाठी सुरू असलेली निवडणूक ही भाजपकडून सुरू असलेली प्रचार आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेले भावनिक आवाहन या दोन मुद्द्‌‍यांवरून सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात या निवडणुकीतही वडगाव नगरपंचायत प्रमाणे ‌‘पर्चेस व्होटिंग‌’ हा एकमेव फंडा वापरला जाणार असल्याचे चित्र दोन्ही पक्षांकडून दिसत आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडूनही प्रचार सुरू आहे.

Election Candidate Money
Lonavala Tiger Point Death: लोणावळा टायगर पॉईंट येथे दरीत पडून मुंबईतील 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

तालुक्यात टाकवे बु. - नाणे, इंदोरी - वराळे, खडकाळा - कार्ला, कुसगाव बु. - काले व सोमाटणे - चांदखेड हे जिल्हा परिषदेचे पाच गट तसेच टाकवे बु., नाणे, इंदोरी, वराळे, खडकाळा, कार्ला, कुसगाव बु., काले, सोमाटणे, चांदखेड हे पंचायत समितीचे दहा गण असून जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी 13 उमेदवार तर पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत.

Election Candidate Money
Pimple Gurav Traffic Issue: पिंपळे गुरवमधील राजमाता जिजाऊ उद्यान चौक वाहतूक व सुरक्षेचा हॉट स्पॉट

उमेदवारांनी आधीपासूनच प्रचार सुरू केला असला तरी दि.27 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रचार आघाडी घेण्याची वेळ आली. दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या दुर्घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त झाली. सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी प्रचार थांबवला. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला, पण राष्ट्रवादी काँग््रेासने प्रचार न करता फक्त पत्रके वाटण्याचा निर्णय घेतला आणि अस्थी कलश यात्रा तसेच पत्रके वाटून भावनिक आवाहन सुरू केले.

Election Candidate Money
PCNTDA Land Survey: पीसीएनटीडीएच्या जागांचे सर्व्हेक्षण सुरू; अतिक्रमण हटविणार

मतदानाला अजून तीन दिवस बाकी असून प्रचाराला दोन दिवस शिल्लक आहेत. परंतु अजूनही ग््राामीण भागात इतर वेळी असणारा निवडणुकीचा माहोल तयार झालेला दिसत नाही. साहजिकच या मागे अजितदादांच्या बाबतीत घडलेली दुर्घटना हे कारण आहे, निवडणूक आहे. पण प्रचाराचा डामडौल करता येत नाही, ही परिस्थिती फक्त राष्ट्रवादीचीच नाही तर इतर पक्षांचीही झाली आहे.

दरम्यान निवडणुकीला अवघे तीन दिवस राहिले असून विस्कळीत झालेली ही निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात ‌‘पर्चेस व्होटिंग‌’ याकडे वळताना दिसत आहे. याआधी झालेली वडगाव नगरपंचायत, लोणावळा व तळेगाव नगरपरिषद निवडणूकही पैशावरच झालेली पाहायला मिळाली. त्यात वडगाव नगरपंचायत निवडणुकीतील पर्चेस व्होटिंग चा फंडा चांगलाच गाजला. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकही हाच फंडा वापरून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Election Candidate Money
Pune Pimpri Passport Applications: पुणे विभागात पासपोर्ट अर्जांचा विक्रमी वाढ; पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

पर्चेस व्होटिंगसाठी इंदोरी-वराळे व खडकाळा -कार्ला गट आघाडीवर!

तालुक्यातील इंदोरी - वराळे गटात भाजपच्या मेघा भागवत व राष्ट्रवादीच्या पल्लवी दाभाडे यांच्यातील लढत तसेच इंदोरी गणातील भाजपचे श्रीकृष्ण भेगडे व राष्ट्रवादीचे दिलीप ढोरे तसेच वराळे गटातील भाजपचे रवींद्र शेटे व राष्ट्रवादीचे राजेंद्र खंडक यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. याशिवाय खडकाळा कार्ला गटात भाजपच्या आशा वायकर व राष्ट्रवादीच्या दिपाली हुलावळे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने या दोन गटांमध्ये पर्चेस व्होटिंग चा फंडा आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news