Pimpri Chinchwad Encroachment Removal: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार; अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

पदपथ, नाले अतिक्रमणमुक्त करा; कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे तातडीने पाडा. अतिक्रमणे, पदपथावरील अतिक्रमण हटवा. ती कार्यवाही ठोस व कठोरपणे करा, असा आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह बांधकाम परवानगी विभागास दिले आहेत. कारवाईची पाहणी ते स्वत: भेट देऊन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Illegal Cables: पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक केबलचे जाळे; अपघातांचा धोका, महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडतेय!

आयुक्तांनी शहरातील वाढत्या अतिक्रमणासंदर्भात बुधवार (दि. २५) बैठक घेतली. त्यात त्यांनी वरील आदेश दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपायुक्त संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, मुकेश कोळप, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे व अधिकारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC Premium Homes: पीसीएमसीमध्ये घर खरेदीचा ट्रेंड बदलला! मोठ्या घरांपेक्षा जीवनशैलीला अधिक पसंती

आयुक्त सूर्यवंशी म्हणाले की, शहरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामे हटवून पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. पादचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता यावे, यासाठी पदपथाची सलग जोडणी कायम ठेवावी. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून आवश्यकतेनुसार पाडकाम करावे. सार्वजनिक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ परिसर दिसेल अशा पद्धतीने स्वच्छता राखावी. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील गळतीच्या समस्या तातडीने दूर करून आवश्यक दुरुस्ती करावी. बीआरटी मार्गालगतच्या महापालिकेच्या पार्किंग सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करावा, असे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad BJP Nominated Corporators: पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी; निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याचा आरोप

कारवाईस विरोध करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला विरोध करून काही जण शासकीय कामात अडथळा निर्माण करतात. त्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नाल्यांवरील अतिक्रमणे हटवा

शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यात यावा. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांवर केलेले अनधिकृत कल्व्हर्ट संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच हटवावेत. हाऊसिंग सोसायट्यांच्या माध्यमातून नाल्यांवर कल्व्हर्ट उभारण्यात आले असल्यास त्याची जबाबदारी संबंधित सोसायटीने घ्यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पावसाचे पाणी अडवले जाणार नाही किंवा त्याचा प्रवाह अन्यत्र वळवून नागरिकांच्या मालमत्तांना धोका निर्माण होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची सात वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा; दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट कायम!

शहरातील आरएमसी प्लांटने नियम पाळावेत

शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटच्या नियोजनाबाबतही बैठकीत चर्चा झाली. शहरात असलेल्या ६५ आरएमसी प्लांटने नियम व निकषांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या प्लांटसाठी स्वतंत्र झोन निश्चित करून त्यासाठी योग्य जागा निश्चित करण्याबाबत नियोजन करावे. व्यावसायिक कारणांसाठी या प्लांटचा वापर करणाऱ्यांनी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.

चिखली घरकुलात पावसाळी पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्या

चिखली येथील घरकुल परिसरात पावसाळ्यात पाणी साचून होणारे नुकसान टाळण्यासाठी नाला बांधणीचे काम व पर्यायी पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कामांना अधिक गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.