Pimpri Chinchwad Illegal Cables: पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक केबलचे जाळे; अपघातांचा धोका, महापालिकेचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडतेय!

विनापरवाना केबल टाकणाऱ्यांवर कारवाईचा अभाव; १६ डिसेंबरपासून केबल हटविण्याची आयुक्तांची तंबी
Illegal Overhead Cables
Illegal Overhead CablesPudhari
Published on: 
Updated on: 

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हजारो विद्युत दिव्यांच्या खांबांवर, झाडे, सीमा भिंत, महावितरणचे डीबी बॉक्स, उड्डाण पुलाचे कठडे, दुभाजक, बॅरिकेट्स आदींवर धोकादायकरित्या केबल व वायरी लटकत असल्याचे दृश्य शहरात सर्वत्र दिसत आहे. या केबलच्या जाळ्यामुळे अपघाताचा तसेच, नागरिकांचा जीव जाण्याचा धोका असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्या हटवण्यात येत नाहीत. राजकीय दबावासमोर झुकून, निव्वळ कारवाईचे इशारे देऊन प्रशासन गप्प बसत असल्याचे चित्र आहे. त्याद्वारे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

Illegal Overhead Cables
PCMC Premium Homes: पीसीएमसीमध्ये घर खरेदीचा ट्रेंड बदलला! मोठ्या घरांपेक्षा जीवनशैलीला अधिक पसंती

महापालिकेने शहरभरात १ लाख १४ हजार ४६२ विद्युत दिव्यांचे खांब बसले असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोणतीही परवानगी न घेता त्या खांबांवर केबल वायरचे जाळे टाकले जात आहे. खांब तसेच, झाडे, सीमा भिंत, महावितरणचे डीबी बॉक्स, उड्डाण पुलाचे कठडे, दुभाजक, बॅरिकेट्स, इमारती, बंगले आदींवरून ओढण्यात आलेल्या इंटरनेट व टीव्ही केबल वायरमुळे दुर्घटना होत आहेत. त्या केबलमुळे विद्युत खांबांचे व त्यावरील विद्युत व्यवस्थेचे नुकसान होत आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून अर्बन स्ट्रीट डिजाईनअंतर्गत प्रशस्त पदपथ तयार करण्यात आले आहेत. त्यावरही वायरचे जाळे लटकत असल्याचे दिसून येते. विना परवाना लटकलेल्या केबलमुळे शहर विद्रुप दिसत आहे. त्याबाबत नागरिक, सामाजिक संस्था, पदाधिकारी व नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्राधिकरण, निगडी येथे लटलेल्या केबल वायरमुळे ४८ वर्षीय दुचाकीस्वार महिलेचा अपघातात मृत्यू झाला. ती दुर्घटना २९ एप्रिल २०२६ ला घडली होती. त्यानंतर महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. मात्र, पुढे काही झाले नाही. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तो मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. मात्र, प्रशासनाने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. तसेच, महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडून, नुकसान होत आहे.

Illegal Overhead Cables
Pimpri Chinchwad BJP Nominated Corporators: पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी; निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याचा आरोप

कारवाई न करता परवानगी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

विनापरवाना केबल वायर टाकलेल्या व्यावसायिकांनी महापालिकेच्या विद्युत विभागाची परवानगी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने करून हात झटकले आहेत विद्युत विभागाने तीन वेळा जाहिर प्रकटन देऊनही केवळ दोन ते तीनच व्यावसायिकांनी प्रतिसाद दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परवानगीसाठी कोणी पुढे येत नसल्याने कारवाई कशी करणार, असा उलट प्रश्न

केबल व्यावसायिक परवानगीसाठी पुढे येत नसल्याने कारवाई करता येत नाही, असा उलट प्रश्न महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. कारवाईअभावी शहरात धोकादायक केबल वायरचे जाळे कायम आहे. प्रशासन नागरिकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का, प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Illegal Overhead Cables
Pimpri Chinchwad Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची सात वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा; दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट कायम!

भूमिगत डक्टमधून केबल टाकण्याच्या आवाहनास प्रतिसाद नाही

शहरात कोणतीही केबल टाकण्यासाठी महापालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून परवाना प्राप्त झाल्यानंतर, स्मार्ट सिटीद्वारे उभारण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कचा वापर करणे किंवा त्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक आहे. शहरात कोणतीही नेटवर्क, टीव्ही केबल किंवा इतर प्रकारच्या केबल टाकण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या खांबांवरही केबलचा विळखा

महापालिकेने शहरातील १८ मीटर रुंद आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून अर्बन स्ट्रीट डिजाईन अंतर्गत प्रशस्त पदपथ व सायकल ट्रॅक तयार केले आहेत. त्यावर सुशोभिकरणासाठी सुमारे ३० हजार रुपये किमतीचे आकर्षक विद्युत खांब उभे केले आहेत. त्या खांबांवरून केबलच्या वायरींचे जाळे ओढण्यात आले आहे. त्यामुळे शहर सौदर्यात भर पडण्यापेक्षा विद्रुपीकरण वाढले आहे. एकीकडे महापालिका प्रशासन सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे तेथे बिनधास्तपणे केबल वायरचे जाळे टाकले जात असल्याचे दिसून येत आहे.

Illegal Overhead Cables
New Sangvi District Hospital Security: नवी सांगवी जिल्हा रुग्णालयातील पोलिस कक्ष कर्मचाऱ्यांविना; रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राजकीय दबावामुळे प्रशासनाचे नमते ?

राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच गुंड, दादा मंडळीकडून शहरात इंटरनेट व केबल टीव्हीचा व्यवसाय केला जातो, हे सर्वांनाच माहित आहे. त्या मंडळींकडून दिव्यांच्या खांबे, झाडे, इमारती तसेच, जागा मिळेल, तेथून धोकादायकपणे केबल वायर टाकण्यात आल्या आहेत. तुटलेल्या वायरीमुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. विनापरवाना केबल टाकून ती मंडळी भरघोस उत्पन्न मिळवतात. मात्र, राजकीय दबावामुळे तसेच, आर्थिक हितसंबंधांमुळे त्या मंडळींवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

व्यावसायिकांकडून नियमांचा उघडपणे भंग

केबल ऑपरेटर व्यावासायिकांनी महापालिकेचा परवाना प्राप्त झाल्यानंतर, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कच्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक आहे. शहरातील कोणतीही टेलिकॉम नेटवर्क, टीव्ही केबल टाकण्यासासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाशी संपर्क साधणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील बहुतांश केबल ऑपरेटर महापालिकेची परवानगी घेत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. प्रशासनही त्या बाबत मूग गिळून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विनापरवाना केबल काढणार

टेलिकॉम, टीव्ही , इंटरनेट, दूरध्वनी, वीजपुरवठा व इतर प्रकारचे टाकण्यात आलेले केबलपैकी वापरात नसलेले किंवा खराब केबल संबंधित ऑपरेटर यांनी १५ डिसेंबरपर्यंत काढून घ्यावेत. वापरात असलेल्या केबलला कंपनीचे नाव, ऑपरेटरचे नाव व संपर्क क्रमांकाचे टॅगिंग करून घेण्यात यावे. अन्यथा १६ डिसेंबरनंतर त्या केबल काढण्याची कारवाई अतिक्रमण विभागामार्फत करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.