Pimpri Chinchwad Water Supply: पवना धरण तुडुंब; तरीही पिंपरी-चिंचवडच्या ३४ सोसायट्यांना टँकरचा आधार!

अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप; हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आंदोलनाचा इशारा
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांना पुरेशा दाबाने आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांना खासगी टँकरवर खर्च करून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पवना धरण 100 टक्के भरलेले असतानाही शहरातील बहुतांश सोसायट्यांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने सदनिकाधारकांची गैरसोय होत आहे. प्रामाणिकपणे मालमत्ताकर भरूनही पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Water Tanker
Pimpri Chinchwad Waste Processing: कचरा प्रक्रिया केंद्रांवरून नगरसेवकांमध्येच मतभेद; प्रशासनासमोर पेच

शहरातील अनेक सोसायट्यांना गेल्या काही काळापासून अपुरा, अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सदनिकाधारकांना नाईलास्तवत मोठ्या प्रमाणावर खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः सध्या पावसाचा हंगाम असताना तसेच, पवना धरण पूर्ण भरलेले असतानादेखील सोसायट्यांना टँकर मागवावे लागत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरातील सोसायट्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नियमित व पुरेसा पाणीपुरवठा का होत नसल्याचे चित्र आहे. पाणी उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर वितरण व्यवस्थापन, जलवाहिन्या, झोननिहाय दाब, वेळापत्रक व प्रत्यक्ष पुरवठा यांचे तातडीने ऑडिट करावे.

Water Tanker
PMPML Bus: मुकाई चौकापुढील मामुर्डी परिसराला ३६७ क्रमांकाची पीएमपीएमएल बससेवा द्या

पावसाळ्यात नैसर्गिकरित्या पाण्याची उपलब्धता वाढलेली असताना नागरिकांना टँकरसाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणे हे महापालिकेचे अपयश आहे. सदनिकाधारकांना दररोजच्या गरजेसाठी टँकर मागवावे लागत आहेत. परिणामी हजारो कुटुंबांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. खासगी टँकर लॉबीसाठी अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे आरोपही करण्यात येत आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. प्रामाणिक करदात्या सदनिकाधारकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासनाकडून तत्परता दाखवली जात नसल्याचे आरोप करण्यात आला आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील तब्बल 34 मोठ्या सोसायट्यांना करावा लागत आहे. त्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.

Water Tanker
Pavana Dam Protest: पवना धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन स्थगित; सरकारला २० दिवसांचा अल्टिमेटम

पाणीपुरवठा अपुरा असतानाही नवीन बांधकामांना परवानग्या

शहरात नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठ्याची क्षमता, उपलब्ध स्रोत, वितरण नेटवर्क व भविष्यातील मागणी यांचा पुरेसा आढावा घेऊन परवानगी दिली जात नसल्याचे दिसत आहे. हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा करणे कठीण होत असताना नवीन बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना पाणीपुरवठ्याच्या क्षमतेचा स्वतंत्र व सार्वजनिक आढावा घेतला जात नसल्याचे चित्र आहे. सरसकट बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केला आहे.

Water Tanker
Pimpri Chinchwad Scrap Transport: पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर उघड्या वाहनांतून स्क्रॅप वाहतूक; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला धोका

पाणीपुरवठ्याचे ऑडिट करावे

शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांना झोननिहाय पाणीपुरवठा, दाब, वेळापत्रक व प्रत्यक्ष मिळणारे पाणी यांचे तातडीने सर्वेक्षण करावे. पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाण्याचे वितरण, शहरासाठी प्रत्यक्ष वापर याबाबत आकडेवारी जाहीर करावी. पाणी उपलब्ध असतानाही कोणत्या कारणांमुळे सोसायट्यांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे, याची तांत्रिक चौकशी करून अहवाल जाहीर करावा. नवीन बांधकाम परवानगी देताना शहराच्या पाणीपुरवठा क्षमतेचा व भविष्यातील मागणीचा स्वतंत्र आढावा बंधनकारक करावा. पाणीपुरवठा, टँकर व बांधकाम परवानग्यांशी संबंधित निर्णय प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. सोसायट्यांना अनावश्यकपणे टँकरवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी तातडीने आपत्कालीन पाणी व्यवस्थापन योजना लागू करावी. टँकर पुरवठ्याची गरज निर्माण करणार्‍या परिस्थितीची स्वतंत्र ऑडिट करून कठोर कारवाई करावी. प्रत्येक प्रभागासाठी जबाबदार अधिकार्‍यांचे नाव, संपर्क क्रमांक आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सार्वजनिक करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news