PCMC Fake Job Letter Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र प्रकरण

भरती नसतानाही तरुणांची फसवणूक; प्रशासनाचा इशारा आणि पोलिसांत तक्रारीचे आवाहन
Fake Job Letter
Fake Job LetterPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या कोणतीही नोकर भरती सुरू नसतानाही काही अज्ञात व्यक्तींनी शहरातील तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन फसवणुकीचा प्रकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, अनेक बेरोजगार तरुण आर्थिक फसवणुकीचे बळी ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Fake Job Letter
Pimpri Wakad Tree Cutting Issue: पिंपरीत सर्व्हिस रस्ता व मेट्रोसाठी 1,375 झाडांची कत्तल

सध्या महापालिकेत कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू नाही. तरीही काही व्यक्तींनी महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार केली आहेत. या पत्रांमध्ये उमेदवारांची निवड झाल्याचे नमूद करून नियुक्तीची तारीख देखील दिली आहे. तसेच पत्रावर 16 हजार पगार अधिक 16 हजार महागाई भत्ता असे दर्शवले आहे. तीन महिने चाचणी कालावधी असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, रुजू होताना शैक्षणिक दाखले, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ही नियुक्ती कायमस्वरुपाची असून महापालिकेच्या सेवा नियमावलीच्या अधीन असेल, असे नियम देण्यात आले आहेत. नियुक्तीपत्रासोबत रुजू होण्याची तारीख व विभागाचे नावही देण्यात आले आहे.

Fake Job Letter
Vadgaon Maval Land Record Office Issue: वडगाव मावळ भूमिअभिलेखचा कारभार प्रभारीच्या हाती!

दरम्यान, या प्रकरणामागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीची ओढ लक्षात घेता काही भामट्यांनी ही संधी साधल्याचे बोलले जात आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे महापालिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Fake Job Letter
Moshi Power Cut Issue: मोशी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

सामान्य प्रशासन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेश तसेच, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. संशयास्पद नियुक्तीपत्र किंवा संदेश प्राप्त झाल्यास थेट महापालिकेशी संपर्क साधावा. या घटनेमुळे महापालिकेच्या नावाचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारे बोगस नियुक्तीपत्र दिल्याचे प्रकार यापूर्वीही महापालिकेत अनेकदा घडले आहेत. मात्र, महापालिकेकडून त्या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Fake Job Letter
Pimpri Chinchwad International Parcel Service: पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशी पार्सलसाठी टपाल खात्याची विशेष सुविधा

आर्थिक फसवणुकीपासून सावध रहावे

सध्या महापालिकेकडून कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबविली जात नाही. नोकर भरती असेल तर त्याबाबतची माहिती महापालिकेच्या ुुु. लािलळपवळर. र्सेीं. ळप या अधिकृत संकेतस्थळावर तसेच, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांची निवड ही पारदर्शक पद्धतीने केली जाते. कोणत्याही प्रकारचे रोख व्यवहार किंवा मध्यस्थांमार्फत पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे अशा आर्थिक फसवणुकीपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन महापालिकेचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news