Vadgaon Maval Land Record Office Issue: वडगाव मावळ भूमिअभिलेखचा कारभार प्रभारीच्या हाती!

प्रभारी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार; जमीन मोजणी व सातबारा कामे रखडली
Maval Land Record Office
Maval Land Record OfficePudhari
Published on
Updated on

गणेश विनोदे

वडगाव मावळ: मावळ तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख असलेले उपअधीक्षक पदासह शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक व छाननी लिपिक अशा चार प्रमुख पदांवर गेल्या दोन महिन्यांपासून मूळ अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकारी कार्यालयाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे या कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Maval Land Record Office
Moshi Power Cut Issue: मोशी प्राधिकरणात विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

भूमिअभिलेख कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी असलेल्या उपअधीक्षक पल्लवी पाटील यांच्यावर 25 जानेवारीदरम्यान निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे रिक्त झालेल्या उपअधीक्षक पदाचा कार्यभार खेड तालुक्याचे उपाधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यावर सोपवण्यात आला आहे. तसेच जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिरस्तेदार म्हणून कार्यरत असलेले सचिन गवारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रभारी म्हणून याच कार्यालयातील निमतानदार एस. पी. बारभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maval Land Record Office
Pimpri Chinchwad International Parcel Service: पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशी पार्सलसाठी टपाल खात्याची विशेष सुविधा

तसेच मुख्यालय सहाय्यक चिंतामण मोरे यांची बदली झाल्याने लोणावळा येथील नगर भूमापन अधिकारी अमोल वाव्हळ यांच्याकडे मुख्यालय सहाय्यक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. याशिवाय छाननी लिपिक असलेले सागर धादवड यांची बदली झाल्याने त्यांचा कार्यभार भूकरमापक युसुफ शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. एकंदर उपअधीक्षक, शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक व छाननी लिपिक ही चार प्रमुख पदे रिक्त असून चारही पदांवर प्रभारी अधिकारी नेमण्यात आले आहेत.

Maval Land Record Office
PCMC Pavanathadi Jatra 2026: पवनाथडी जत्रेला आजपासून सुरुवात; सांगवीत 1 मार्चपर्यंत रंगणार उत्सव

या कार्यालयांतर्गत विशेष करून जमिनीची सरकारी मोजणी, मालमत्ता पत्रक नोंदणी ही महत्त्वाची कामे होत असतात व या कार्यालयातील कामकाजावरच जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार, न्यायालयात असलेल्या जमिनींच्या केसेस, सातबारा उताऱ्यावरील नोंदी, जमीन अकृषिक करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया अशी अनेक कामे केली जातात. याशिवाय या कार्यालयांतर्गत अनेक प्रकारच्या केसेसच्या सुनावण्या घेतल्या जातात व निकाली काढल्या जातात. त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. असे असताना याच कार्यालयातील प्रमुख चार पदे रिक्त असून, प्रभारी अधिकारी त्यांच्याकडे असलेला मूळ जबाबदारी व्यतिरिक्त हा अतिरिक्त कारभार पाहत असल्याने अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे सबंधित पदांवर तत्काळ मूळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Maval Land Record Office
PCMC Budget 2026-27: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2026-27 अर्थसंकल्प शनिवारी सादर

इतके हेलपाटे पंढरपूरला मारले असते तर विठ्ठल भेटला असता!

भूमिअभिलेख कार्यालयात विविध कामांसाठी हेलपाटे मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असेच एक शेतकरी एका कामासाठी कार्यालयात आले, पण या वेळीही अधिकारी भेटले नाही. त्या वेळी हतबल झालेल्या शेतकऱ्याने मफइतके हेलपाटे पंढरपूरला मारले असते तर विठ्ठल भेटला असता!फफ अशी टिपण्णी करत आपली नाराजी व्यक्त केली.

रिक्त असलेल्या पदांवर प्रभारी असलेले अधिकारी

  • उपअधीक्षक मावळ - नितीन सूर्यवंशी, उपअधीक्षक खेड (अतिरिक्त कार्यभार)

  • शिरस्तेदार - एस.पी. बारभाई, निमतानदार (प्रभारी)

  • मुख्यालय सहाय्यक - अमोल वाव्हळ, लोणावळा भूमापन अधिकारी (प्रभारी)

  • छाननी लिपिक - युसुफ शेख, भूकरमापक (प्रभारी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news