

पिंपरी: विदेशात पार्सल, कागदपत्रे पाठविण्यासाठी नागरिकांसाठी विशेष सुविधा टपाल खात्याने उपलब्ध करून दिली आहे. खासगी कुरिअर आणि इतर कंपन्यांपेक्षा विश्वासार्थ आणि माफक दरात ती सुरू करण्यात आली आहे. पुणे शहर पूर्व विभाग अर्थात पिंपरी चिंचवडमधील सर्व टपाल कार्यालयात यासाठी पार्सल पॅकेजिंग युनिट स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे आरक्षासाठी स्वतंत्र गर्दीत थांबण्याची गरज नसणार.
चिंचवड येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये ग््रााहकांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्याच्या उद्देशाने पार्सल पॅकेजिंग युनिट ची स्थापनादेखील करण्यात आलेली आहे. या युनिटअंतर्गत वेगवेगळ्या तीन क्षमतेचे बॉक्स नागरिकांसाठी उपलब्ध असून या बॉक्सला अगदी योग्य आणि पद्धतशीर पॅकिंग करण्यासाठीचे मशीनदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
तसेच, सर्वसामान्य नागरिकांसमवेत बुकिंग करण्यासाठी स्वतंत्र लाईन मध्ये थांबण्याची गरज नाही. त्यासाठी एका स्वतंत्र काउंटरचीदेखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्देशाने परदेशात पाठवण्यात येणाऱ्या पार्सलसाठी हे एक खूप महत्त्वाचे पाऊल टपाल विभागाचे आहे.
विशेष म्हणजे सर्वसामन्यांना परवडेल असे दर असल्याने पार्सल किंवा कागदपत्रे पाठवण्यासाठी इतरत्र धावपळ करण्याची गरज नाही. टपाल विभागाने स्पीड पोस्ट, पार्सल या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या. पिंपरी चिंचवड उपविभागाच्या अंतर्गत पीसीएनटी टपाल कार्यालय, चिंचवडगाव टपाल कार्यालय, भोसरी गाव, पिंपरी पीएफ टपाल, इन्फोटेक पार्क हिंजवडी, खडकी या पोस्ट ऑफिस मध्ये बुकिंग साठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या सुविधेमध्ये आणखी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्याचेदेखील पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर समीर महाजन यांनी सांगितले.
ग््रााहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने तसेच, परदेशस्थित नागरिकांना सुलभ दराने पार्सल व कागदपत्रे पाठवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल आहे. स्पीड पोस्ट व पार्सलचे दरही इतर खासगी कुरिअर कंपन्यांपेक्षा परवडेल असे आहेत.
काळुराम पारखी, माहिती जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड