Pimpri Chinchwad Diwali Shopping: दिवाळीच्या खरेदीला पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात; मुलांच्या परीक्षांमुळे बाजारपेठांतील गर्दी कमी

फराळाच्या साहित्य खरेदीसाठी गृहिणींची लगबग; सहामाही परीक्षा संपल्यानंतर कपडे आणि फटाके खरेदीला वेग येण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा
Diwali Faral
Diwali FaralPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: दसरा संपताच आता दिवाळीच्या तयारीला वेग येऊ लागला आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठांमध्ये फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, शाळांमध्ये सुरू असलेल्या सहामाही परीक्षांमुळे अनेक मुले अभ्यासात व्यस्त असून, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये अद्याप अपेक्षित गर्दी झालेली नाही. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर खरेदीला अधिक वेग येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Diwali Faral
Vadgaon Maval Water Supply: वडगाव मावळमध्ये पाणीटंचाईचे संकट; शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

दिवाळी म्हटले की, घराघरांत फराळाची तयारी, नवीन कपड्यांची खरेदी आणि आकर्षक सजावटीची लगबग सुरू होते. यंदाही शहरातील गृहिणींनी दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पोहे, रवा, बेसन, मैदा, साखर, गूळ, तेल, तूप, सुकामेवा यांसह चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळे तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.

Diwali Faral
Pimpri Chinchwad Property Registration: पिंपरी-चिंचवडमध्ये दस्त नोंदणीचा खोळंबा; आधार पडताळणी आणि सर्व्हरच्या समस्यांनी नागरिक हैराण

अनेक कुटुंबांमध्ये दिवाळीचा फराळ घरीच तयार करण्याची परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे शाळा सुरू असताना आणि मुलांच्या परीक्षांचे वेळापत्रक सांभाळत गृहिणींकडून फराळाच्या तयारीचे नियोजन केले जात आहे. काही पालक सकाळी मुलांना शाळेत सोडल्यानंतर किंवा मुले शाळेत गेल्यावर बाजारपेठेत जाऊन आवश्यक साहित्य खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

Diwali Faral
Pimpri Chinchwad RRR Centres: दिवाळीच्या साफसफाईत वस्तू फेकू नका! पिंपरी-चिंचवडमध्ये १० क्षेत्रीय कार्यालयांत आरआरआर केंद्रे

'घरीच फराळ करण्यासाठी साहित्य खरेदी सुरू'

गृहिणी सविता आहेर म्हणाल्या, दिवाळीत आम्ही फराळ घरीच तयार करतो. त्यामुळे चकली, चिवडा, लाडू आणि करंजीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. मुलांच्या परीक्षा आणि घरातील इतर कामे सांभाळून दिवाळीची तयारी करावी लागत असल्याने आतापासूनच साहित्य खरेदी करण्यावर भर दिला आहे.

Diwali Faral
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख! ऑक्टोबरमध्ये ८१ रुग्ण; मलेरियाचे १३ रुग्ण

परीक्षानंतर फटाके स्टॉल वाढणार

दुसरीकडे, फटाके विक्रेत्यांनाही मुलांच्या सहामाही परीक्षा संपण्याची प्रतीक्षा आहे. सध्या अनेक विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असल्याने फटाके खरेदीकडे त्यांचे लक्ष कमी आहे. परीक्षा संपल्यानंतर पालकांसोबत मुले फटाके खरेदीसाठी बाहेर पडतील आणि शहरातील विविध भागांमध्ये फटाक्यांचे स्टॉल वाढतील, अशी अपेक्षा फटाके विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news