Pimpri Chinchwad RRR Centres: दिवाळीच्या साफसफाईत वस्तू फेकू नका! पिंपरी-चिंचवडमध्ये १० क्षेत्रीय कार्यालयांत आरआरआर केंद्रे

जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुनर्वापर होणार; वापरण्यायोग्य वस्तू गरजूंना देण्यासाठी महापालिकेचे आवाहन
RRR Centres
RRR CentresPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: घरातील वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा. त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आरआरआर (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी घरातील अडगळ ठरलेल्या वस्तू टाकून न देता या केंद्रांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

RRR Centres
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख! ऑक्टोबरमध्ये ८१ रुग्ण; मलेरियाचे १३ रुग्ण

घराची साफसफाई करताना जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, भांडी, फर्निचर तसेच, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या वस्तू अनेकदा निरुपयोगी समजून फेकून दिल्या जातात. त्यामुळे कचर्‍याचे प्रमाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. या वस्तू सुस्थितीत असल्यास त्यांचा पुनर्वापर करून त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविता येऊ शकतात. या विचारातून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरआरआर केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

RRR Centres
Ulhas Jagtap Municipal Secretary: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगर सचिवपदी उल्हास जगताप; शासनाची नियुक्तीला मान्यता

उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले, की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराची साफसफाई करताना वापरण्याजोग्या वस्तू फेकून न देता आरआरआर केंद्रांमध्ये जमा कराव्यात. नागरिक व हाऊसिंग सोसायट्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून महापालिकेला सहकार्य करावे. लोकसहभागातूनच स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड शहर घडविणे शक्य आहे.

RRR Centres
Pimpri Illegal Pistol Case: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक; पिस्तूल आणि काडतूस जप्त

या वस्तू जमा करा

आरआरआर केंद्रांमध्ये पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, सुस्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला व पुनर्वापर करता येण्याजोग्या अन्य वस्तू जमा करता येतील. अशा वस्तू संकलित करण्यासाठी 7030901993 किंवा 9168684670 या क्रमांकावर संपर्क साधावा.

RRR Centres
Smita Jadhav Graduate Election: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिता जाधव यांना विविध संघटनांचा पाठिंबा; मावळातून ९५ टक्के मतदानाचे लक्ष्य

शहरातील आरआरआर केंद्र

मोरवाडीतील कापसे उद्यान, आकुर्डी भाजी मंडई, प्राधिकरण, निगडी येथील संत तुकाराम महाराज उद्यान, चिंचवड येथील श्रीधरनगर उद्यान, थेरगाव येथील एस. के. एफ. कंपनीशेजारी, हेगडेवार पूल, दर्शननगरी, रावेतमधील धर्मराज चौक, काळेवाडीतील ज्योतिबा उद्यान, अजमेरा कॉलनीतील हेगडेवार क्रीडा संकुल, भोसरीतील धावडेवस्ती, मोशीतील संत सावता महाराज उद्यान, इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे सौदागर येथील लिनियर उद्यान, कोकणे चौक, पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, वाकडमधील तानाजी कलाटे उद्यान, मोशी चौक, दिघी जकात नाका, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पूल, चिखलीतील वृंदावन, पूर्णानगर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान रुपीनगर पोलिस चौकी, सेक्टर क्रमांक 21 मधील शनी मंदिर, थेरगाव रुग्णालयाशेजारी, जगतापनगर, थेरगावातील मोरू बारणे उद्यान, पिंपरी गाव बसथांबा, रहाटणी गावठाणातील आरोग्य कोठी, संत तुकारामनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, कासारवाडीतील सीतांगण उद्यान, पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलाव, सांगवी भाजी मंडई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news