Vadgaon Maval Water Supply: वडगाव मावळमध्ये पाणीटंचाईचे संकट; शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने शुक्रवार (दि .२३) पासून वडगाव शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.

Water Supply
Pimpri Chinchwad Property Registration: पिंपरी-चिंचवडमध्ये दस्त नोंदणीचा खोळंबा; आधार पडताळणी आणि सर्व्हरच्या समस्यांनी नागरिक हैराण

दुष्काळाशी लढा देण्यासाठी आजच पाण्याची बचत करण्याची आवश्यकता असल्याने नगरपंचायतीच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी नळाला गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करून घ्यावी.

Water Supply
Pimpri Chinchwad RRR Centres: दिवाळीच्या साफसफाईत वस्तू फेकू नका! पिंपरी-चिंचवडमध्ये १० क्षेत्रीय कार्यालयांत आरआरआर केंद्रे

टाकी अथवा हौद भरताना ओव्हर फ्लो टाळावा. वाहने व अंगण धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. शहरातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा अंघोळ, कपडे, भांडी धुण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे व पाण्याची बचत करून नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news