Pimpri Chinchwad Diwali Fire Incidents: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या आतषबाजीचा भडका! अवघ्या २४ तासांत आगीच्या ७६ घटना

मोकळी मैदाने, घरे आणि दुकानांना आगी; २५० जवान आणि ४२ अग्निशमन वाहने सज्ज, सुदैवाने जीवितहानी टळली
Diwali Fire Incidents
Diwali Fire IncidentsPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात अवघ्या २४ तासांत आगीच्या तब्बल ७६ घटना घडल्या आहेत. शहरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना अग्निशमन दलाच्या जवानांना मात्र दिवसभर आगीशी झुंज द्यावी लागली. सुदैवाने सर्व घटनांमध्ये वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने केलेल्या नियोजनामुळे मोठ्या दुर्घटना टळल्या.

Diwali Fire Incidents
Cyber Fraud Gold Purchase: सायबर चोरट्यांचा सराफांना फटका! यूपीआयद्वारे सोने खरेदी करून लुबाडलेली रक्कम लपविण्याचा नवा फंडा

अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ८) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरातील विविध भागांतून आगीचे कॉल प्राप्त झाले. यामध्ये सर्वाधिक ५० घटना मोकळी मैदाने, सुके गवत, कचरा आणि झाडांना आग लागल्याच्या होत्या, तर २० ठिकाणी फ्लॅट, घरे आणि दुकानांना आग लागली. उर्वरित सहा घटनांमध्ये फ्लेक्स, वाहने, टॉवर आणि कंपाऊंडला आग लागल्याची नोंद झाली.

Diwali Fire Incidents
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नियमित दहा अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त १२ संवेदनशील ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. एकूण ४२ वाहने आणि २५० अधिकारी, कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले होते. त्यामुळे घटनांची माहिती मिळताच जवानांनी तातडीने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात घटना घडल्याने जवानांची धावपळ झाली. नागरिक दिवाळी साजरी करत असताना अग्निशामक दलाचे जवान मात्र कर्तव्यावर तैनात होते.

Diwali Fire Incidents
Bhaubeej Digital Payment: भाऊबीजेच्या ओवाळणीला डिजिटल टच! पाकिटातील पैशांची जागा आता यूपीआय पेमेंटने घेतली

अग्निशमन दलाची विशेष तयारी

दिवाळीच्या काळात आगीच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. नियमित दहा केंद्रांसह शहरातील १२ मोक्याच्या ठिकाणी पथके सज्ज होती. या नियोजनामुळे एकाच वेळी विविध भागांत घटना घडूनही मदतकार्य सुरू ठेवणे शक्य झाले. जवानांनी कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

Diwali Fire Incidents
Indrayani River Debris: इंद्रायणी नदीपात्रातील राडारोडा हटविण्यास ठेकेदाराची टाळाटाळ; देहू नगरपंचायतीची नोटीस कागदावरच?

आगीच्या घटनांची आकडेवारी

  • मोकळी मैदाने, गवत, कचरा, झाडे : ५०

  • फ्लॅट, घरे आणि दुकाने : २०

  • फ्लेक्स, वाहने, टॉवर, कंपाऊंड : ६

  • एकूण घटना : ७६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.