Pimpri Chinchwad Cyber Crime: येरवडा कारागृहात ‘सायबर’ कट; बँक खाती पुरवून ८६ लाखांची फसवणूक, बीएएमएस विद्यार्थ्यासह दोघे अटकेत

जेलमधील ओळखीतून सुरू केले रॅकेट; आठ बँक खाती वापरल्याचे उघड, आणखी मोठ्या सायबर गुन्ह्यांची तयारी
Pimpri Chinchwad Cyber Crime
Pimpri Chinchwad Cyber CrimePudhari
Published on
Updated on

पिंपरी: येरवडा कारागृहात झालेल्या ओळखीतून सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरविण्याचे रॅकेट सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये बीएएमएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad Cyber Crime
Sangvi Stray Dog Attack: आईच्या कडेतील एक वर्षाचे बाळ रस्त्यावर कोसळले; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात थरारक प्रसंग

तेजस ज्ञानोबा लोखंडे (२४, रा. मरकळगाव, पुणे) आणि अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (२८, रा. लातूर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान फसवणुकीतील पाच लाख रुपये १४ जुलै २०२६ रोजी इंडसइंड बँकेतील एका खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले. हे खाते तेजस लोखंडे याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

Pimpri Chinchwad Cyber Crime
Pimpri Chinchwad Structural Audit: पालिकेच्या-सरकारी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट कागदावरच? धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत

मोठी फसवणूक करण्याच्या तयारीत

या टोळीने सायबर गुन्ह्यांसाठी आतापर्यंत आठ वेगवेगळी बँक खाती उघडून अथवा प्राप्त करून वापरल्याचे समोर आले आहे. आणखी करंट बँक खाती उघडण्यासाठी आरोपींनी ‘सस्टेन ब्लॉक कन्स्ट्रक्शन’ आणि ‘स्ट्रुनोवा प्रा. लि.’ या नावाने कार्यालये सुरू केली होती. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Cyber Crime
Pimpri Chinchwad Vehicles Without Number Plates: पिंपरी-चिंचवडमध्ये विना नंबरप्लेट वाहने सर्रास रस्त्यावर; अपघात झाल्यास जबाबदार कोण?

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे व पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, रोहित डोळस तसेच पोलिस हवालदार हेमंत खरात, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, विनायक म्हसकर, स्वप्निल खणसे, सुनील यादव, विशाल निश्चित, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, देवा वाघमारे, सूरज शिंदे, दीपाली चव्हाण व स्मिता पाटील यांच्या पथकाने केली.

Pimpri Chinchwad Cyber Crime
Indrayani River Rejuvenation Project: जागा ताब्यात नसतानाच इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाची घाई; ४३० कोटींचे काम पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे

जेलमध्येच प्लान

तेजस याच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्याची साखळी उघड झाली. हिंजवडी पोलिस ठाण्यातील अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात तेजस न्यायालयीन कोठडीत असताना त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात अविनाश बाकलीकर याच्याशी ओळख झाली होती. अविनाश याला २०२४ मध्ये सायबर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक झाली होती. तो सुमारे दीड वर्ष येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देण्याचे नियोजन दोघांनी इतर साथीदारांसह कारागृहातच केल्याचे तपासात समोर आले. बाहेर आल्यानंतर अविनाशच्या सांगण्यावरून तेजसने स्वतःचे बँक खाते उघडून त्याला दिले.

गुन्हेगारांचे नंबर ‘युनिव्हर्सिटी’ नावाने सेव्ह

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अविनाश बाकलीकर याला लातूर येथून ताब्यात घेतले. अविनाश बीएएमएस पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, तो परदेशी साथीदारांच्या थेट संपर्कात राहून सायबर गुन्हे करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. येरवडा कारागृहात असताना अविनाशने शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींशी संपर्क वाढवला होता. जामिनावर सुटल्यानंतर या गुन्हेगारांचे मोबाईल क्रमांक त्याने स्वतःच्या फोनमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने सेव्ह करून ठेवले होते. त्यांच्याशी संपर्क साधून तो सायबर गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news