Pimpri Chinchwad Vehicles Without Number Plates: पिंपरी-चिंचवडमध्ये विना नंबरप्लेट वाहने सर्रास रस्त्यावर; अपघात झाल्यास जबाबदार कोण?

एचएसआरपीचा नियम कागदावरच? सामान्य वाहनांसह महापालिका, शासकीय वाहनांवरही नियमांचा विसर; नागरिकांकडून कारवाईची मागणी
Vehicles Without Number Plates
Vehicles Without Number PlatesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील विविध भागांत तसेच उपनगरांमध्ये विना नंबरप्लेटची अनेक वाहने सर्रास ऱस्त्यावरून धावताना दिसतात. दिवसाढवळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ही वाहने रस्त्यावरून धावत असतानाही याकडे वाहतूक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. अशा विना नंबरप्लेट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Vehicles Without Number Plates
Indrayani River Rejuvenation Project: जागा ताब्यात नसतानाच इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाची घाई; ४३० कोटींचे काम पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दररोज लाखोंच्या संख्येने वाहने रस्त्यावरून धावत असतात. त्यातील अनेक वाहने ही विनानंबर प्लेटची असल्याचे दिसून येते. तर काही वाहनांवर नियमबाह्य अथवा स्पष्टपणे न दिसणाऱ्या नंबर प्लेट असल्याचे चित्र आहे , तसेच वाहनांवरील हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) संदर्भातील नियमांची अंमलबजावणी सुरू असतानाही शहरातील काही वाहनांवर अद्याप जुन्या पद्धतीच्या किंवा अस्पष्ट नंबर प्लेट दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे, महापालिका प्रशासनाशी संबंधित वाहनेही रस्त्यावर नियमांकडे दुर्लक्ष करून धावताना दिसून येत आहे. सामान्य वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालन अपेक्षित असताना शासकीय यंत्रणेच्या वाहनांबाबतच अशी परिस्थिती असेल, तर नियमांची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Vehicles Without Number Plates
Pimpri Chinchwad Metro: पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; मेट्रो, ई-आरटीएससह पार्किंग धोरणाला गती

नंबर प्लेट नसलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास संबंधित वाहनाची ओळख पटविणे, वाहनमालकाचा शोध घेणे आणि घटनेची शहानिशा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे अशा वाहनांमुळे अपघात किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

शहरातील रस्त्यांवर अशा वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासनाने तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशेषतः शासकीय आणि महापालिकेच्या वाहनांचीही तपासणी करून सर्व वाहनांकडे वैध नोंदणी व नियमानुसार नंबर प्लेट आहे की नाही, याची खातरजमा करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Vehicles Without Number Plates
Pimple Gurav Footpath Parking: पिंपळे गुरवमध्ये पदपथावरच वाहनांचा ठिय्या; पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात

उपाययोजना काय?

  • विना नंबर प्लेट व नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविणे.

  • एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची स्वतंत्रपणे तपासणी करून नियमानुसार कारवाई करणे.

  • महापालिका, शासकीय व इतर विभागांच्या वाहनांचीही नियमित पडताळणी करणे.

  • नंबर प्लेट अस्पष्ट, तुटलेली किंवा छेडछाड केलेली आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देणे.

  • सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा वाहनांची ओळख पटवून ई-चलनाद्वारे कारवाईची व्यवस्था.

  • सर्व वाहनांवर स्पष्ट व नियमांनुसार नंबर प्लेट असणे सुनिश्चित करावे.

  • शासकीय वाहनांवरही वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

Vehicles Without Number Plates
Lonavala Traffic Congestion: लोणावळ्यात सातही दिवस वाहतूक कोंडीचा विळखा; पोलिसांसमोर मोठे आव्हान

नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईही सर्वांवर समान होणार का? की सरकारी वहान म्हणजे आम्हाला कोन विचारतेय, असे तर नाही ना? नियम फक्त आम्हाला सर्वसाधारण जनतेलाच आहेत का? यावर वाहतुक विभागाने योग्य ती कारवाई करुन अशा वाहनांवर प्रतिबंध घालावा.

केदार कोटे, ज्येष्ठ नागरिक.

वाहनावर नियमानुसार नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे. नंबर प्लेट नसलेली अथवा नियमबाह्य नंबर प्लेट असलेली वाहने आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती वाहतूक विभागाला द्यावी. शासकीय अथवा महापालिकेची वाहनेदेखील वाहतूक नियमांच्या कक्षेत असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news