

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील युनिट्सची हद्द आणि रचना नव्याने ठरविण्यात आली आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या युनिट क्रमांक 1 ते 5 या रचनेत बदल करून आता 4 युनिट्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रशासकीय दृष्ट्या कार्यक्षमता वाढवणे आणि गुन्हे तपासाच्या कामकाजात गती आणणे हा या पुनर्रचनेचा उद्देश असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.(Latest Pimpri chinchwad News)
या फेररचनेमुळे प्रत्येक युनिटला निश्चित पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या औद्योगिक पट्ट्यातील (चाकण, भोसरी, तळेगाव) गुन्हे तपासात सुसूत्रता येणार आहे. नागरी भागातील (पिंपरी, चिंचवड, सांगवी, हिंजवडी) प्रकरणांवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. तसेच, ग््राामीण व औद्योगिक भागातील समन्वय अधिक मजबूत होईल. पूर्वी काही युनिट्सवर पोलिस ठाण्यांची संख्या अधिक होती. नव्या रचनेनंतर प्रत्येक युनिटला संतुलित जबाबदारी मिळेल, त्यामुळे तपास अधिक गतिमान होईल, असे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
युनिट - 1 भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, दापोडी, पिंपरी, निगडी, चिंचवड, संत तुकारामनगर
युनिट - 3 चाकण, महाळुंगे, दिघी, आळंदी
युनिट - 4 वाकड, हिंजवडी, सांगवी, काळेवाडी, बावधन
युनिट - 5 देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, रावेत
युनिट - 1 पिंपरी, निगडी, चिंचवड, संत तुकारामनगर, दापोडी, सांगवी
युनिट - 2 वाकड, हिंजवडी, काळेवाडी, बावधन, रावेत
युनिट - 3 भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, चाकण, चाकण दक्षिण (प्रस्तावित), आळंदी
युनिट - 4 देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगाव, चिखली, उत्तर महाळुंगे एमआयडीसी (प्रस्तावित), महाळुंगे एमआयडीसी.