

Pune Bus Travels Rates Diwali
पिंपरी : काही दिवसांवर दिवाळी सण आल्याने गावी जाण्यासाठी अनेकजण एस.टी. ला पसंती देतात; परंतु एसटी व रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे अनेकांना खासगी प्रवासी गाड्यांतून गाव गाठवे लागते; मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. दिवाळीनिमित्त गावी निघालेल्या प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून आर्थिक लूट केली जात आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झालेले आहेत. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून आतिरिक्त बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. पण एसटी बस आणि रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार एसटी बसच्या दीडपट तिकीट दर आकारता येतो; परंतु पण, खासगी प्रवासी वाहतूक दारांकडून नियमित तिकीट दरापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त गावी जाणार्यांना आर्थिक झळ बसत आहे.
पुण्यात व पिंपरी-चिंचवड शहरात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या भागात आतिरिक्त बस सोडण्यात येत आहेत; परंतु एस.टी, रेल्वे गाडयांचे ॲडव्हान्स बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्स गाड्यांशिवाय पर्याय राहिला आहे. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून घेतला जात आहे.
राज्य शासनाच्या 2018 च्या निर्णयानुसार खासगी प्रवासी बसला एसटी महामंडळाच्या प्रवासी तिकीट दराच्या दीडपट जादा भाडे आकारू शकतात; परंतु सध्या खासगी बस तिकीट दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या आणि गर्दीच्या हंगामात ट्रॅव्हल्सकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. आर्थिक लूटमार करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा पश्न निर्माण होत आहे.
अमरावती - 2200 ते 2300
अकोला- 1900 ते 2000
लातूर - 1500 ते 3000
नागपूर - 2800 ते 3000
जालना- 1200 ते 1500
सोलापूर - 1000 ते 1200
जळगाव - 1500 ते 1800
बुलढाणा- 1600 ते 1700
एसटी बसचे
तिकीट दर
अमरावती -1100
अकोला- 850
लातूर -580
सोलापूर- 458
बुलढाणा -670
नागपूर -1272
जळगाव- 699
शहरात निगडी, भोसरी, सांगवी, पिंपळे गुरव, नाशकि फाटा, मोशी, चिखली, डांगे चौक येथून ट्रॅव्हल्स बस ये-जा करतात.
दिवाळीनिमित्त ट्रॅव्हल्सवाल्यांकडून केली जाणारी भाडेवाढ लक्षात घेता, आरटीओच्या वतीने मिंटीग घेण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त अव्वाच्या-सव्वा भाडेवाढ करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई केली जाणार आहे. ट्रॅव्हल्सच्या विरोधात काही तक्रारी असल्यास आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, तिकिटाच्या फोटोसह 8275330101या व्हॉटस ॲप क्रमांकावर पाठवावे.
सुरेश आव्हाड, सहायक परिवहन अधिकारी