Diwali Faral 2025: रेडिमेड फराळाचा बाजारात दरवळ

महागाईच्या पार्श्वभूमीवरही रेडिमेड फराळ लोकप्रिय; गृहिणी व बचत गटांचा व्यवसाय तेजीत
Diwali Faral 2025
रेडिमेड फराळाचा बाजारात दरवळPudhari
Published on
Updated on

पिंपरी : दिवाळीपूर्वी दोन-तीन दिवस आधी रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बचत गटाकडून आणि गृहिणी उद्योगातील महिलांनी तयार केलेले लाडू, चिवडा, चकली या फराळांच्या पदार्थाना या बाजारांध्ये चांगली मागणी राहते. सध्या या महिलांची दिवाळी फराळ बनविण्याची लगबग सुरु आहे.(Latest Pimpri chinchwad News)

Diwali Faral 2025
Cyber fraud: दिवाळीत ‘ऑफर’च्या आमिषाने सायबर टोळ्या सक्रिय; पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

एकीकडे नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना दिवाळीसणामध्ये फराळ बनविण्यास वेळ नसतो. त्यामुळे दिवाळीचा फराळ घरी बनविण्याऐवजी रेडिमेड फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे ज्या महिलांना घरची जबाबादरी सोडून बाहेर पडून काम करता येत नाही. ज्यांना उत्पन्नाचे काहीच साधन नाही. अशा महिलांसाठी दिवाळी हे अर्थार्जनाचे साधन झाले आहे. बऱ्याच गृहिणींना दिवाळीचे फराळ, आणि इतर वस्तू विक्रीतून रोजगार मिळत आहे.

Diwali Faral 2025
Eco-Friendly Diwali Sky Lanterns: आकाशकंदिलांच्या झगमगाटाने फुलली पिंपरीची बाजारपेठ

बचत गटांबरोबरच शहरातील अनेक महिलाही दिवाळीपुरता हा व्यवसाय घरोघरी करतात आणि त्यांच्याकडील मागणीही दरवर्षी वाढत असल्याचा अनुभव आहे. विशेषत: घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, अनारसे अशा पदार्थाना तर मोठी मागणी असते. तयार फराळ खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक महिलांसाठी दिवाळी फराळ तयार करून त्याची विक्री हे व्यवसायाचे साधन झाले आहे.

Diwali Faral 2025
Eco-Friendly Diwali Sky Lanterns: आकाशकंदिलांच्या झगमगाटाने फुलली पिंपरीची बाजारपेठ

रेडिमेड फराळाला महागाईची झळ

दरवर्षी सणासुदीला फराळासाठी लागणाऱ्या तेल, साखर, रवा, बेसन, मैदा, तूप, हरबरा डाळ, खाबरे यांच्या भावामध्ये वाढ होत असते. त्यामुळे रेडिमेड फराळाच्या दरातही वाढ झालेली आहे.

Diwali Faral 2025
Nashik Phata Foot Over Bridge: नाशिक फाटा चौकात उभारला जाणार बहुप्रवासी पादचारी पूल

फराळाचे दर प्रतिकिलो :

चकली 650 रूपये, शंकरपाळे (गोड, खारे) 500 रूपये, चिवड 500 रूपये, बेसन लाडू 650 रूपये, रव्याचे लाडू 500 रूपये, अनारसे 650 रूपये, करंजी 650 - 700 रूपये.

अनेक नोकरदार महिला रेडिमेड फराळाला पसंती देतात. फराळाचे भाव दरवर्षी वाढतात यंदा देखील 10 ते 15 टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. तूप, खोबरे, शेंगदाणे, तेल महाग झाले आहे. नेहमीच्या पारपंरिक फराळाबरोबर खाजे, पुडाच्या करंजी असे काही पदार्थ देखील बनविले जातात.

अंकिता राऊत (रेडिमेड फराळ विक्रेत्या)

Diwali Faral 2025
Snakebite treatment: खासगी रुग्णालयात सर्पदंशासाठी योजना लाभात अडचणी; सरकारी उपचारांचे महत्त्व

आम्ही दिवाळी सणापुरता फराळाचा व्यवसाय करतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही फराळ तयार करण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी फराळासाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

सुनीता बोडके (गृहिणी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news