Pimpri Chinchwad Construction Permission Revenue: बांधकाम परवानगी उत्पन्नात 86 कोटींची घट

पर्यावरण मंजुरीतील विलंबाचा फटका; इतर विभागांनी महसूल वाढवला
Construction
ConstructionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागास सन 2025-26 या आर्थिक वर्षांत तब्बल 794 कोटी 77 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी सन 2024-25 या वर्षी या विभागास 881 कोटी 30 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विभागाचे उत्पन्न 86 कोटी 53 लाखांने घटले आहे.

Construction
PCMC Property Tax Collection: पीसीएमसीचा विक्रम; 947 कोटींची मालमत्ताकर वसुली

शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण विभागाची ईएस प्रमाणपत्राऐवजी केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. त्या प्रमाणापत्रासाठी अधिक वेळ जात आहे. तसेच, जागेची मोजणीप्रक्रियेस स्थगिती प्रक्रिया रखडल्याने बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न घटल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात बांधकाम परवनागीच्या मुख्य शुल्कातून 711 कोटी 53 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. युटीएफ शुल्कातून 83 कोटी 24 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. असे एकूण 794 केटी 77 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता सुनील भागवानी यांनी सांगितले.

Construction
Pimpri Chinchwad Traffic Issue: कृष्णा चौकात अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

पाणीपट्टीतून 78 कोटींचे उत्पन्न

महापालिकेकडून निवासी व बिगरनिवासी मिळकतींना पिण्याच्या पाण्याचे जोड दिले जातात. त्याला महापालिका पाणी शुल्क आकारते. त्यातून सन 2025-26 या आर्थिक वर्षांत एकूण 78 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी सन 2024-25 या वर्षांत एकूण 76 कोटी 41 लाखांचे उत्पन्न मिळाले होते, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Construction
Pimpri Chinchwad Road Condition: मुंबई-पुणे महामार्गावर खड्डे-धुळीचा त्रास; वाहनचालक हैराण

आकाशचिन्ह विभागाचे उत्पन्न दीड कोटीने वाढले

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवानगी विभागास सन 2025-26 या आर्थिक वर्षांत एकूण 21 कोटी 50 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी सन 2024-25 मध्ये त्या विभागास एकूण 19 कोटी 94 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. या विभागाकडून जाहिरात होर्डिंगला परवाना दिला जातो. परवाना शुल्क आणि नूतनीकरण शुल्कातून या विभागास उत्पन्न मिळते. यंदा एकूण 1 कोटी 56 लाख रुपयांने वर्षभरातील उत्पन्नात भर पडली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात या विभागास 18 कोटी 50 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. शहरातील अनधिकृत होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली. शहरातील सर्व होर्डिंगचे परवाना नूतनीकरण करण्यात आले. त्या माध्यमातून शुल्क वाढले. परिणामी, या विभागाचे उत्पन्न वाढले आहे, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.

अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात 15 कोटी 23 लाखांची वाढ

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून इमारत आणि आस्थापनांना फायर सर्टिफिकेट दिले जाते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यातून अग्निशमन विभागास उत्पन्न मिळते. सन 2025-26 या आर्थिक वर्षांत या विभागास एकूण 178 कोटी 27 लाख 22 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षांत हे उत्पन्न 163 कोटी 4 लाख 11 हजार 651 रुपये इतके होते. यंदा त्यात 15 कोटी 23 लाख रुपयांची वाढ झाली आहे, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

Construction
Helmet Safety India: स्वस्त हेल्मेट ठरते धोकादायक; RTOचा इशारा

झोपडपट्टी सेवाकरातून 1 कोटी 15 लाखांचे उत्पन्न

शहरातील झोपडपट्टीतून महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडून घरटी सेवा कर जमा केला जातो. यंदाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षांत सर्वांधिक विक्रमी 1 कोटी 15 लाख रुपयांचे उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे. महिला बचत गटांकडून प्रत्येक झोपडीधारकांस सेवाकराचे बिल वाटप करण्यात येते. तसेच, ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोठी सेवा कराची वसुलीत तिप्पट वाढ झाली आहे. गेल्या सन 2024-25 या आर्थिक वर्षांत 45 लाखांचे उत्पन्न सेवाकरातून मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 70 लाख रुपयांची घसघशीत भर पडली आहे, असे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी

मागील चार वर्षांतील उत्पन्न

  • सन 2021-22 :1 हजार 60 कोटी

  • सन 2022-23 : 781 कोटी

  • सन 2023-24 : 804 कोटी

  • सन 2024-25 : 881 कोटी 30 लाख

  • सन 2025-26 : 794 कोटी 77 लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news