Helmet Safety India: स्वस्त हेल्मेट ठरते धोकादायक; RTOचा इशारा

निकृष्ट दर्जामुळे अपघातात जीवितहानीचा धोका; आयएसआय हेल्मेट वापरण्याचे आवाहन
Helmet
HelmetPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: किरकोळ अपघातातही निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटमुळे अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अद्यापही अनेकजण पैसे वाचविण्याच्या मोहापायी रस्त्याच्या कडेला स्वस्तात मिळणारे हेल्मेट खरेदी करतात. मात्र, असे दर्जाहीन तसेच स्वस्तातले हेल्मेट परिधान करणे अपघातावेळी आपल्या जिवावर बेतू शकते.

Helmet
Pimpri MIDC Street Light Issue: एमआयडीसी परिसर अंधारात; पथदिव्यांअभावी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न

शहरातील अनेक भागात रस्त्याच्या बाजूस अनेकजण हलक्या दर्जाच्या हेल्मेटची विक्री करतात. अनेकजण स्वस्तात मिळते म्हणून हे दर्जाहीन हेल्मेट खरेदी करतात. मात्र यामुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार करत नाहीत. त्यामुळे काहींचा रस्ते अपघातात बळी जातो; मात्र उत्तम दर्जाचे हेल्मेट वापरल्यास अपघाता वेळी जीवदेखील वाचतो.

Helmet
Pimpri Chinchwad Vehicle Theft: सराईत वाहन चोर अटकेत; 11 दुचाकी जप्त, 9 गुन्ह्यांचा उलगडा

बाजारात विविध प्रकारचे हेल्मेट उपलब्ध आहेत. त्यामध्ये फुल साइज हेल्मेट, हाफ फेस, मॉड्युलर हेल्मेट त्यापैकी संरक्षणासाठी फुल साइज हेल्मेट वापरण्यासाठी योग्य असल्याचे आरटीओचे म्हणणे आहे. काही दुचाकीस्वार हेल्मेटच वापरत नाहीत. सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करतात, अशा प्रवाशांवर वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत गतवर्षी पोलिसांनी 5 कोटी 4 लाख 45 हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली.

Helmet
Pimpri Chinchwad Police Bikes: स्टंटबाज आणि सोनसाखळी चोरट्यांसाठी पोलिसांची ‘धूम’ तयारी; 400 सीसी बाईक्सचा ताफा सज्ज

उत्तम दर्जाचे हेल्मेट खरेदी करताना

हेल्मेट खरेदी करताना आयएसआय मार्क असलेले आणि प्रमाणपत्र तपासणे गरजेचे आहे. हेल्मेट हे फायबर-ग्लास कंपोझिटने बनविलेले असावे. उत्तम दर्जाचे हेल्मेट कार्बन कंपोझिटने बनविले जातात. त्यापैकी एक पांढरा रंग तो समान रंगाचा बाहेरील भाग दर्शवितो आणि दुसरा काळा असतो सूर्यप्रकाशात मदत करतो. तसेच काही हेल्मेटमध्ये दोन्ही प्रकारच्या टिंट असतात.

काय सांगतो कायदा:

मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 929 अन्वये दुचाकी चालवत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय मानांकन विभागाने प्रमाणित केलेल्या शिक्क्याचे हेल्मेट वापर करणे गरजेचे आहे.

हेल्मेटचे प्रकार:

1) ट्रॅक हेल्मेट

2) एडीव्ही हेल्मेट

3) सेफ्टी रेंटिग हेल्मेट

4) डबल -डी लॉक हेल्मेट

Helmet
Pimpri Property Tax Collection: पिंपरीत मालमत्ताकराचा विक्रमी भरणा; 923 कोटींचा टप्पा पार

ट्रॅक हेल्मेट हे फुल हेल्मेट आहे. जे डोक्याला अधिक संरक्षण देते. तरुण-तरुणींमध्ये ह्या हेल्मेटची क्रेझ आहे. तसेच अनेकजण आयएसआय असलेले हेल्मेट घेतात. मात्र, यांच्या किमती जास्त आहेत; परंतु हे हेल्मेट सुरक्षित आहेत.

गजानन अगरवाल, हेल्मेट विक्रेता

हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्मेट न घालणे म्हणजेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. प्रवासदरम्यान एखादी घटना घडल्यास हेल्मेटमुळे कित्येक प्रवाशांचा जीव वाचतो. त्यामुळे अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून योग्य कारवाई केली जात आहे.

विवेक पाटील, पोलिस उपायुक्त वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news