PCMC Property Tax Collection: पीसीएमसीचा विक्रम; 947 कोटींची मालमत्ताकर वसुली

अभय योजनेचा मोठा परिणाम; नागरिकांच्या प्रतिसादामुळे महसुलात वाढ
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सन 2025-2026 या आर्थिक वर्षात तब्बल 947 कोटी रुपयांचा मामलत्ताकर वसूल केला आहे. महापालिकेने दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटींचा टप्पा पार केला असून, हा करसंकलन विभागाचा माईलस्टोन ठरला आहे. सात लाख 32 हजार पैकी 6 लाख 27 हजार 790 मालमत्ताधारकांनी बिल भरले आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. करसंकलन विभागाने गेल्या वर्षी 940 कोटी रुपयांचा कर वसूल केला होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या कामात करसंकलन विभागाचे कर्मचारी तीन महिने गुंतले असल्याने त्या फटका बसला. अन्यथा 1 हजार कोटींच्या पुढे कर वसूल झाला असता, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

Property Tax
Pimpri Chinchwad Traffic Issue: कृष्णा चौकात अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करणे, मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध करणे, शहरात होर्डिंग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मीडियाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पीकरवर थकबाकीदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपूर्व नोटिसा देण्याची कार्यवाही करण्यात आली. या कारणांमुळे 947 कोटी कर वसूल झाला आहे. ती मंगळवारी (दि.31) सायंकाळी सहापर्यंतची आकडेवारी आहे.

Property Tax
Pimpri Chinchwad Road Condition: मुंबई-पुणे महामार्गावर खड्डे-धुळीचा त्रास; वाहनचालक हैराण

वाकड कार्यालयातून सर्वाधिक वसुली

करसंकलन विभागाच्या शहरातील 18 विभागीय कार्यालयात वाकड विभागाने सर्वात जास्त कर वसूल केला आहे. वाकडमध्ये तब्बल 117 कोटी 18 लाख 38 हजार 911 रुपयांची वसुली झाली आहे. थेरगाव 97 कोटी 61 लाख 33 हजार 993 रुपयांचा कर जमा झाला आहे. चिंचवड कार्यालयाने 77 कोटी 34 लाख 68 हजार 824, चिखली कार्यालयाने 67 कोटी 60 लाख 85 हजार 591, किवळे 64 कोटी 89 लाख 78 हजार 719, भोसरी 63 कोटी 69 लाख 82 हजार 456, मोशी 62 कोटी 58 लाख 30 हजार 786, कस्पटे वस्ती 57 कोटी 92 लाख 13 हजार 458, पिंपरी वाघेरे 50 कोटी 77 लाख 25 हजार 106, सांगवी 48 कोटी 28 लाख 25 हजार 562, मनपा भवन 41 कोटी 48 लाख 16 हजार 800, आकुर्डी 40 कोटी 60 लाख 71 हजार 575, च-होली 38 कोटी 41 लाख 20 हजार 803, फुगेवाडी 35 कोटी 30 लाख 98 हजार 749, दिघी-बोपखेल 27 कोटी 49 लाख 24 हजार 559, तळवडे 26 कोटी 16 लाख 2 हजार 452 आणि निगडी-प्राधिकरण 21 कोटी 1 लाख 73 हजार 832 कर जमा झाला आहे. सर्वांत कमी 8 कोटी 42 लाख 47 हजार 145 रुपयांचा कर पिंपरी कॅम्प कार्यालयातून जमा झाला आहे.

Property Tax
Helmet Safety India: स्वस्त हेल्मेट ठरते धोकादायक; RTOचा इशारा

अभय योजनेमुळे करवसुलीत वाढ

नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी दिलेला सकारात्मक प्रतिसाद ही महापालिकेसाठी अभिमानाची बाब आहे. कर भरणे ही केवळ जबाबदारी नसून शहराच्या विकासात थेट योगदान देणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विविध सेवांच्या बळकटीसाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अभय योजना लागू केल्यामुळे कर वसुलीत वाढ होण्यास मदत झाली, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

विलंब दंडावरील 90 टक्के सवलतीमुळे मोठा प्रतिसाद

थकबाकीदारांच्या अभय योजनेचा मार्च महिन्यात 83 हजार 470 जणांनी लाभ घेतला. 31 दिवसांमध्ये तब्बल 197 कोटी 18 लाख रुपयांचा कर वसूल झाला. नागरिकांना तब्बल 45 कोटी 13 लाख रुपयांची सवलत मिळाली. या योजनेमुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला. तसेच, महापालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली. माझ्याकडे 2 फेबुवारी 2026 ला या विभागची जबाबदारी आल्यानंतर दोन महिन्यांत करवसुलीसाठी नियोजन केले. या कालावधीत अडीचशे कोटींचा कर वसूल करण्यात आला. त्यामुळेच दुसऱ्यांदा साडेनऊशे कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश आले, असे करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Property Tax
Pimpri MIDC Street Light Issue: एमआयडीसी परिसर अंधारात; पथदिव्यांअभावी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न

कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार

करसंकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे करवसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कर भरणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी

  • निवासी- 5 लाख 52 हजार 42

  • बिगरनिवासी - 52 हजार 211

  • औद्योगिक - 4 हजार 783

  • मिश्र- 13 हजार 674

  • मोकळ्या जमीन - 5 हजार 49

  • इतर - 31

  • एकूण 6 लाख 27 हजार 790

..असा जमा झाला मालमत्ताकर

  • ऑनलाईन - 706 कोटी 72 लाख

  • रोख - 83 कोटी 88 लाख

  • धनादेश - 110 कोटी 52 लाख

  • ईडीसी - 6 लाख

  • डीडी - 7 कोटी 9 लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news