

पिंपरी: विनापरवाना राजकीय मेळावा घेतला, वस्तू अथवा साड्यांचे वाटप, वाढदिवसांचा कार्यक्रम घेतला, अशा प्रकारच्या विविध 15 तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, आणखी काही तक्रारींची शहानिशा करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.
शहरात निवडणुकीच्या कालावधीत गेल्या 22 दिवसांत 15 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 14 निकाली काढण्यात आल्या आहेत. सहा ठिकाणी विनापरवाना बोर्ड, बॅनर लावल्याप्रकरणाच्या काही तक्रारी आहेत. ते संबंधितांकडून तातडीने काढून घेतले आहेत. तर, इतर तक्रारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात पाठविण्यात येत असून, त्या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी त्या तक्रारीची शहानिशा करून पुढील कार्यवाही करतात. दरम्यान, यापैकी 1 तक्रार ही राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. तर, निवडणूक आचारसंहिता कक्षात 2 तक्रार आल्या असून, इतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
सर्वाधिक तक्रारी ब क्षेत्रीय अंतर्गत
शहरामध्ये विविध आठ ठिकाणी निवडणूक निर्णय कार्यालय आहे. त्यातील ब क्षेत्रीयअंतर्गत सर्वाधिक 7 तक्रारी आल्या आहेत. प्रभाग 16,17,18 आणि 22 या चार प्रभागाचे कामकाज चालते. तर, इतर प्रभागात 1 अथवा 2 अशा सरासरी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
..अशी होते कारवाई
आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत तक्रार पथक स्थापन करण्यात येते. ते पथक स्थळ पाहणी करते. आवश्यकता असल्यास त्याचा पंचनामा करण्यात येतो. त्याचा अहवाल हा संबंधित क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात येतो. तो अहवाल आचारसंहिता कक्षाकडे दिला जातो.
शहरात आठ ठिकाणी तक्रारीसाठी पथके नेमली आहेत. त्याचा आढावा वेळोवळी घेण्यात येतो. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात कोणत्याही प्रकाराची माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित ती क्षेत्रीय कार्यालयात द्यावी.
व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, आचासंहिता कक्ष