Pimpri Chinchwad Chhath Puja: पिंपरी-चिंचवडमध्ये छठपूजेची लगबग; सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी उत्तर भारतीय बांधव सज्ज

१३ नोव्हेंबरपासून व्रताला सुरुवात; १५ नोव्हेंबरला मावळत्या, तर १६ नोव्हेंबरला उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठपर्वाची सांगता
Chhath Puja
Chhath PujaPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: छट हा सूर्यदेवाची उपासना करण्याचा महत्त्वाचा सण आहे. हा प्रामुख्याने बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशात थाटामाटात साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरातदेखील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दिवाळीनंतर येणारा छटपूजेच्या तयारीत सध्या उत्तर भारतवासीय गुंतले आहेत.

Chhath Puja
Pimpri Chinchwad Domestic Tourism: दिवाळीच्या सुट्यांत पिंपरी-चिंचवडकरांचा देशांतर्गत पर्यटनाकडे कल; परदेशवारीचा बेत बदलला

हा सण सूर्यदेव आणि छठी मातेला समर्पित आहे, ज्यामध्ये मुलांच्या सुख-समृद्धीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी ३६ तासांचा उपवास ठेवला जातो. हा सण आत्म-शुद्धी, मुलांची सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या आनंदाचे प्रतीक मानला जातो. १५ नोव्हेंबर (रविवार) रोजी मावळत्या सूर्याला अर्घ्य आणि १६ नोव्हेंबर (सोमवार) रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छटपर्वाची सांगता होईल.

Chhath Puja
Moshi Depot Accident Victims: मोशी डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका; आठ कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

शुकवार (दि. १३) छटपूजेच्या व्रताला सुरुवात झाली आहे. महिला स्नान करून आपली घरे शुद्ध करतात आणि भोपळा व चण्याच्या डाळीचा प्रसाद बनवून ग्रहण करतात. उद्या शनिवार ( दि. १४) व्रती दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गुळाची खीर आणि पोळी खाऊन व्रत पूर्ण करतात.

Chhath Puja
Kasarwadi Swimming Pool Theft: कासारवाडीतील डॉ. आंबेडकर जलतरण तलावात चोरी; शॉवर, नळांसह लाखोचे साहित्य लंपास

रविवारी (दि.१५) पहिले अर्घ्य मावळत्या सूर्याला पाणी, दूध आणि फुले अर्पण केली जातात. महिला पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा करतात. सोमवारी दुसरे अर्घ्य (१६ नोव्हेंबर ) उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता केली जाते. त्यानंतर कुटुंबासोबत प्रसाद ग्रहण केला जाणार आहे. यासाठी शहरातील इतर घाटांवर सर्व उत्तर भारतीय बांधव शहरातील नदीघाटावर पूजेसाठी गर्दी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.