Pimpri Chinchwad Census 2026: पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या किती ?

लोकसंख्या 35 लाखांपर्यंत वाढणार; प्रगणकांद्वारे डिजिटल जनगणना, नगरसेवक व आमदार संख्या वाढीची शक्यता
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तब्बल 15 वर्षे जनगणना न झाल्याने शहराची नेमकी लोकसंख्या किती हे समोर आलेले नाही. प्रत्येक विभागाकडून लोकसंख्येची वेगवेगळी ढोबळ आकडेवारी जाहीर केली जात आहे. आता, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जनगणनेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. जनगणना झाल्यानंतर शहराची खरी लोकसंख्या समजू शकेल.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Smart City VMD: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील 13 कोटींचे व्हीएमडी प्रकल्प कालबाह्य, उत्पन्न केवळ 60 लाख

यापूर्वी सन 2011 साली शहराची जनगणना झाली होती. त्यानुसार, 17 लाख 27 हजार 692 इतकी शहराची लोकसंख्या होती. सन 2001 नंतर दहा वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल 7 लाखांनी वाढली. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्ते, पुणे आणि मुंबई शहराची सुलभ कनेक्टिव्हीटी, चांगले वातावरण, स्वच्छ हवा आदी कारणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास मोठी पसंती दिली जात आहे. देशात राहण्यायोग्य शहर म्हणून

पिंपरी-चिंचवडला मोठी पसंती मिळत आहे. शहरात चारी बाजूने टोलेजंग इमारती निर्माण होत आहेत. अनेक नवीन हाऊसिंग सोसायट्या तयार होत आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या तब्बल 35 लाखांपर्यंत पोहचली असल्याचे सांगितले जात आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Talegaon Dabhade Mazi Vasundhara Abhiyan 5.0: माझी वसुंधरा अभियान 5.0 : तळेगाव दाभाडे नगर परिषदेला विभागस्तरीय प्रथम क्रमांक

केंद्र शासनाने जनगणनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात एकाच वेळी प्रत्यक्ष जनगणना पुढील वर्षी मार्च महिन्यात केली जाणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेस देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यासंदर्भात करावयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच, जनजगणना विभागाचे उपायुक्त सचिन पवार हे आहेत. जनगणनेत डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन, तांत्रिक अडचणींचे वेळेत निराकारण आणि सर्व विभागांतील समन्वय ठेवण्याचा सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत.

नगरसेवक, आमदारांची संख्या वाढणार

जनगणनेनंतर लोकसंख्येची आकडेवारीसमोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची नगरसेवक संख्या 128 वरून 160 ते 170 इतकी होऊ शकते. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. तसेच, मतदार संख्या वाढल्याने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघ निर्माण होतील. त्यामुळे शहराला तीनऐवजी पाच आमदार मिळतील. तसेच, शहरासाठी स्वतंत्र लोकसंख्या मतदारसंघही स्थापन होईल. तर, शहराला स्वत:चा एक स्वतंत्र खासदार मिळेल. त्याद्वारे शहराचे प्रश्न दिल्लीच्या संसदेत मांडले जातील.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Navi Sangvi Footpath Encroachment: नवी सांगवीतील शिरोळे रोडवरील पदपथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

मोबाईल ॲपद्वारे जनगणना

पिंपरी-चिंचवड शहराची जनगणना करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासंदर्भात मुंबईत कार्यशाळाही झाली. प्रगणक नियुक्तीची कार्यवाही सुरू आहे. त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यानंतर मोबाईल ॲपद्वारे शहरात प्रत्यक्ष कामकाज केले जाईल, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

शहरासाठी 5 हजार 500 प्रगणक

शहराच्या जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ती जनगणना मोबाईल ॲपद्वारे केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या 180 ते 200 घराचा एक ब्लॉक (गट) तयार करण्यात येणार आहेत. गणनगणेसाठी घरांची यादी तयार केली जाणार अहे. त्या घरांची गणना करण्यासाठी एक प्रगणक नेमला जाणार आहे. घरांची ही मोजणी 16 मे ते 15 जून या कालवाधीत केली जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महापालिकेकडून तब्बल 5 हजार 500 प्रगणक तसेच, पर्यवेक्षक नेमले जाणार आहेत. ते काम शिक्षकांकडून केले जाणार आहे. त्याकरिता प्रगणकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक प्रगणकाच्या मोबाईलमध्ये जनगणनेचे ॲप डाऊनलोड केलेले असेल. त्यांच्याद्वारे घरांची यादी, ब्लॉक यादी तयार केली जाईल.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Moshi Shri Nageshwar Maharaj Yatra: श्री नागेश्वर महाराज यात्रेत ‘मानाचा विडा’ 25 लाखांना; लिलावातून दीड कोटींहून अधिक निधी

जातनिहाय प्रथमच जनगणना

प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर, घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य, तसेच, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग व प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयी प्रश्न विचारतील. पिण्याचा पाणी व विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता, स्वयंपाकासाठी एलपीजी, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन, स्मार्टफोन, वाहन, तसेच, आहारातील मुख्य धान्य कोणते आदी माहिती घेतली जाणार आहे. जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल.

शहराचा आराखडा बनविण्यासाठी उपयुक्त

पिंपरी-चिंचवड शहर 173.12 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. त्यातील रहिवाशी क्षेत्र सर्वाधिक 4 हजार 893 हेक्टर इतके आहे. ते प्रमाण 47.8 टक्के इतके आहे. व्यापारी क्षेत्र 672 हेक्टर, औद्योगिक क्षेत्र 1 हजार 976 हेक्टर, उद्यान, मैदानाचे क्षेत्र 378 हेक्टर, सार्वजनिक क्षेत्र 430 हेक्टर, वाहतुकीचे क्षेत्र 1 हजार 674, संरक्षण विभागाचे क्षेत्र 9 हेक्टर आहे. असे एकूण 10 हजार 232 हेक्टर विकसित क्षेत्र आहे. शेती क्षेत्र 2 हजार 941 हेक्टर, जल क्षेत्र 391 हेक्टर, रिकामी जागा 3 हजार 573 हेक्टर, वन व डोंगर क्षेत्र 175 हेक्टर आहे, असे विकसित न झालेले 7 हजार 80 हेक्टर क्षेत्र आहे. शेती आणि औद्योगिक क्षेत्र कमी होऊन त्या ठिकाणी निवासी क्षेत्र वेगाने वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे. शहराचा विकास योजना आराखडा (डीपी प्लॅन) बनविण्यासाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे. सन 2011 नुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 इतकी आहे. त्यानुसार, शहरात 1 हजार पुरुषांमागे 833 महिला असे प्रमाण आहे. जनगणनेनंतर महिला, पुरुष, बालकांचे प्रमाण समजणार आहे. त्यानुसार, महापालिकेस नागरी सेवा व सुविधांसह विविध योजना राबवणे सुलभ होणार आहे. त्यानुसार, महापालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news