Navi Sangvi Footpath Encroachment: नवी सांगवीतील शिरोळे रोडवरील पदपथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगमुळे ज्येष्ठ, महिला व विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ
Navi Sangvi Footpath Encroachment
Footpath EncroachmentPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: नवी सांगवी परिसरातील शिरोळे रोडवर व्यापाऱ्यांनी पदपथांवर मोठे काउंटर, फर्निचर व जाहिरातीचे स्टॅण्ड ठेवून केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल होत असून, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश पदपथांवर व्यावसायिकांनी आधीच वर्दळीचा असलेला हा रस्ता अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे.

Navi Sangvi Footpath Encroachment
Moshi Shri Nageshwar Maharaj Yatra: श्री नागेश्वर महाराज यात्रेत ‘मानाचा विडा’ 25 लाखांना; लिलावातून दीड कोटींहून अधिक निधी

शिरोळे रोड हा परिसरातील प्रमुख मार्ग असून, कृष्णा चौकातील सिग्नलमुळे येथे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत पदपथांवर व्यापाऱ्यांनी ठेवलेले साहित्य आणि रस्त्यालगत केलेले अनधिकृत पार्किंग यामुळे पदपथ पादचाऱ्यांना वापरता येत नाहीत. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहनांच्या गर्दीतून रस्त्यावरून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

Navi Sangvi Footpath Encroachment
Pimpri Chinchwad School Sports Referee Honorarium: शालेय क्रीडा स्पर्धांच्या पंचांचे मानधन सहा महिने रखडले

या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात दुकाने असून, दिवसभर खरेदीसाठी ग््रााहकांची गर्दी असते. अनेक वाहनचालक रस्त्यावरच गाड्या पार्क करत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे पदपथांवरील अतिक्रमणाचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. नागरिकांच्या मालमत्ता करातून बांधण्यात आलेले पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी असताना त्यांचाच वापर अतिक्रमणासाठी होत असल्याचे चित्र दिसत आहे. पदपथांचा वापर पादचाऱ्यांसाठी की अतिक्रमणासाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Navi Sangvi Footpath Encroachment
Pimpri Chinchwad Minority Schools RTE: पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पसंख्याक शाळांची वाढ; आरटीई टाळण्यासाठी नवा फंडा?

संबंधित प्रशासनाने तातडीने अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगवर कारवाई करून पदपथ मोकळे करावेत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अन्यथा संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील पदपथावर अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.

स्थानिक नागरिक

Navi Sangvi Footpath Encroachment
Bhosari Khandevasti Group Clash: भोसरीतील खंडेवस्ती येथे दोन गटांत हाणामारी; जुन्या वादातून मारहाण

नवी सांगवीतील शिरोळे रोडवरील पदपथांवरील अतिक्रमणाची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. तातडीने पाहणी करून पदपथावरील अतिक्रमण काढून टाकण्यात येईल. तसेच पदपथ नागरिकांसाठी खुला करून देण्यात येईल. तसेच व्यावसायिकांनीदेखील पदपथ मोकळा ठेवावा.

अश्विनी गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news