Anna Bhau Sathe Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व; सात दिवस सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी

निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात आयोजन; परिसंवाद, व्याख्याने, लोककला, गायन आणि साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल
Anna Chau Sathe
Anna Chau SathePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन शनिवार (दि. १) ते शुक्रवार (दि. ७) दरम्यान सात दिवस निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे करण्यात आले आहे. या पर्वात सामाजिक प्रबोधन, परिसंवाद, व्याख्यान, गायन, लोककला, वादन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

Anna Chau Sathe
Junk Food Ban In Schools: पिंपरी-चिंचवडमध्ये शाळांजवळ जंक फूडचा सुळसुळाट; ५० मीटर परिसरातील विक्रीवर बंदीची अंमलबजावणी रखडली

महापालिका भवनातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि भक्ती-शक्ती चौकातील साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शनिवारी सकाळी महापौर रवी लांडगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पर्वास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सनईवादन, हलगीवादन, बँड स्पर्धा होणार आहेत. सकाळी साडेदहाला ही छक्कड अण्णाभाऊं आणि त्यानंतर लेखणीचा बादशहा हा कार्यक्रम आहे. दुपार एकला हास्यकल्लोळ, तीनला स्वरचंदन हा गीतगायनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी पाचला महाराष्ट्राची लोकसंस्कृती व सायंकाळी सातला मेरा भारत महान हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आहे.

Anna Chau Sathe
Pimpri Chinchwad Cyber Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; दोन तरुणांवर गुन्हे, बँक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर

रविवार (दि. २) सकाळी दहा वाजता राधा खुडे यांचे आणि दुपारी दीडला अनिकेत जवळेकर यांचे गीतगायन आहे. आरक्षणाची समता व उपवर्गीकरणाची गरज आणि वास्तव या विषयावरील परिसंवाद दुपारी तीनला आहे. सायंकाळी पाचला नितीन बानगुडे पाटील हे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे - ‘क्रांतीचा धगधगता इतिहास’ या विषयावर सायंकाळी पाचला व्याख्यान आहे. सायंकाळी सहाला फोक संस्कृती हा कार्यक्रम आहे.

Anna Chau Sathe
Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सोमवार (दि. ३) सकाळी दहाला गीतगायन होणार आहे. दुपारी तीनला मातंग समाजाचा प्राचीन इतिहास या विषयावरील परिसंवाद आहे. सायंकाळी पाचला स्वर पंचम हा संगीत कार्यक्रम व सायंकाळी सातला ‘गजर अण्णाचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम गायक चंद्रकात शिंदे सादर करणार आहेत. मंगळवारी (दि. ४) दुपारी एकला व्याख्याते वसंत हंकारे यांचे कौटुंबिक व सामाजिक व्यवस्थेवरील प्रबोधनपर व्याख्यान आहे. दुपारी दोनला काजल शिंदे यांचे महिला जनजागृतीपर व्याख्यान, दुपारी अडीचला मातंग समाजातील शिक्षणातील आव्हाने व सामाजिक उपाय या विषयावरील परिसंवाद आहे. सायंकाळी पाचला खेळ पैठणीचा हा महिलांसाठी कार्यक्रम आहे.

Anna Chau Sathe
Spine Road Potholes: शहरातील रस्‍त्‍यात खड्‍डे की खड्‍ड्यात रस्‍ता? स्पाईन रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

बुधवारी (दि. ५) दुपारी बाराला गाता शूर वीरांची, दुपारी दोनला साहित्य सम्राट अण्णाभाऊ महान हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दुपारी तीनला महिला सक्षमीकरण : आजची गरज व उद्याची आव्हाने या विषयावरील परिसंवाद आहे. सायंकाळी पाचला गायक साजन बेद्रे यांचा अण्णा तुमच्यासाठी हा लोकगीतांचा कार्यक्रम आहे. गुरुवारी (दि. ६) सकाळी 10.30 ला कवी संमेलन आहे. दुपारी चारला लेखणीचा बादशहा, सायंकाळी पाचला गायक संकल्प गोळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आहे. समारोपाच्या दिवशी शुक्रवार (दि. ७) सकाळी 11.30 ला आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील व्याख्यान प्रा. प्रदीप कदम हे देणार आहेत. दुपारी चारला शाहीर युवराज ढगे व निवास चव्हाण यांच्या पोवड्याचा कार्यक्रम आहे. सायंकाळी सहाला महाराष्ट्राचा मराठी बाणा हा गीतमय कार्यक्रम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news