Spine Road Potholes: शहरातील रस्‍त्‍यात खड्‍डे की खड्‍ड्यात रस्‍ता? स्पाईन रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

महापालिकेचे दुर्लक्ष : वाहनचालकांना अपघाताचा धोका
Spine Road Potholes
Spine Road PotholesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून स्पाईन रोड उभारला आहे; परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी या रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवून रस्ता रहदारीस सुरळित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spine Road Potholes
Rohit Pawar: मोशी दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा; रोहित पवार यांची मागणी

प्रभाग क्रमांक ११ मधील कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून महापालिकेने तातडीने खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. गेल्या वर्षीही याच स्पाईन रोडवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले होते.

मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसून, यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Spine Road Potholes
Friendship Day Bands: फ्रेंडशिप डेची धूम! एलईडी, मेटल आणि मॅग्नेटिक बँडची बाजारात मोठी मागणी

खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सुमारे ५६० खड्डे असल्याचा दावा केला असून, गेल्या वर्षभरात खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी150 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था पाहता हा निधी नेमका कुठे खर्च झाला, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

स्पाईन रोड हा शहरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण व अवजड वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुचाकींना अपघात घडणे, वाहनांचे नुकसान होणे अशा घटना घडत आहेत. तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास खड्ड्यांचे "भावपूर्ण श्रद्धांजली" आंदोलन मोठ्या छेडण्यात येईल.

- मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्ते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news