Junk Food Ban In Schools: पिंपरी-चिंचवडमध्ये शाळांजवळ जंक फूडचा सुळसुळाट; ५० मीटर परिसरातील विक्रीवर बंदीची अंमलबजावणी रखडली

एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंचा आदेश; वडापाव, पिझ्झा, चिप्स, कोल्डड्रिंक्ससह एचएफएसएस पदार्थांवर निर्बंध
Junk Food
Junk FoodPudhari
Published on
Updated on

पिंपरी: राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळेपासून ५० मीटर अंतरापर्यंत एचएफएसएस म्हणजे हाय फॅट, सॉल्ट, शुगर असलेले जंक फूडची विक्री, जाहिरात आणि मोफत वाटपावर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बंदी घातली आहे; मात्र पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांच्या आवारात तसेच, ५० मीटर परिसरात जंकफूडच्या टपऱ्या लागलेल्या दिसत आहेत.

Junk Food
Pimpri Chinchwad Cyber Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; दोन तरुणांवर गुन्हे, बँक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर

जंकफूड बंदीची अंमलबजावणी करण्याबाबत शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि स्थानिक प्रशासनाला जबाबदारी दिली आहे. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही महिन्यांपासून ॲक्शन मोडमध्ये आहेत. गुटखा बंदी कडक अंमलबजावणी, वर्तमानपत्रात खाद्य पदार्थ देण्यावर बंदी घातली आहे. तसेच, भेसळविरोधी अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.

Junk Food
Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शहरातील परिस्थिती बदलण्याची पालकांना आशा

जंकफूडची सवय मोडून चांगले घरगुती पदार्थ खाण्याची मुलांना सवय लागावी म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरविणारी एक आहारसंहितादेखील तयार केली होती. तरीही शैक्षणिक संकुलांच्या उपाहारगृहामध्ये वडापाव, भजीपाव, जेली, कोल्डड्रिंक्स, चायनीज फूड यासारखे पदार्थ सहज मिळतात. वडापाव, पिझ्झा, बर्गर, चिप्स, समोसे असे पदार्थ बाहेर सहज मिळत असल्यामुळे हे खाण्याकडे मुलांचा ओढा वाढत आहे. मात्र, या ओढ्याबरोबर जीवघेण्या आजारांना लहानपणीच तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. मुलांना कितीही थांबविण्याचा प्रयत्न केला तरी ते बाहेर जाऊन जंकफूडसारखे पदार्थ खातच असतात आणि हे पदार्थ महाविद्यालयाच्या उपहारगृहात मिळत असल्यामुळे नकळत हे पदार्थ खाल्ले जातात. आता तुकाराम मुंडे यांनी काढलेल्या आदेशानंतर शहरातील चित्र बदलेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Junk Food
Spine Road Potholes: शहरातील रस्‍त्‍यात खड्‍डे की खड्‍ड्यात रस्‍ता? स्पाईन रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य

जंकफूडची सर्रास विक्री

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या उपहारगृहांमधूनही जंकफूडसारख्या खाद्यपदार्थाची विक्री केली जाऊ नये, असे आदेश एफडीएने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणून २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्यांना यावर अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. या आदेशानुसार आता उशिरा का होईना, पण जंकफूड हद्दपार करण्यासाठी पाउले उचलली गेली आहेत. सध्या शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील उपहारगृहामध्ये आजही जंकफूडचे पदार्थ खाण्यास मिळतात. जंकफूडवर निर्बंध असतानाही याची सर्रास विक्री सुरू असलेली दिसत आहे.

Junk Food
Rohit Pawar: मोशी दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा; रोहित पवार यांची मागणी

मुख्याध्यापकांच्या काही जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. शिक्षक-पालक व्यवस्थापन समितीच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्याचबरोबर आमचीही जबाबदारी आहे. शाळांच्या ५० मीटर परिघात जंकफूड विक्री करता येणार नाही. काही ठिकाणी शाळांचे कॅन्टिन असेल त्या ठिकाणी मेनू बदलण्याची गरज आहे. एक-दोन दिवसांत आम्ही पाहणी करून कारवाई करू.

दिगंबर भोगावडे, सहआयुक्त, अन्न, औषध प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news