Chakan Murder Case: पिंपरीत धक्कादायक प्रकार; मुलाने मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराचा निर्घृण खून

चाकण उत्तर पोलिसांनी 20 दिवसांत उकल; तीन आरोपी अटकेत
Murder
MurderPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मुलाने मित्राच्या मदतीने आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. 11 जानेवारी रोजी बिरदवडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत अनोळखी मृतदेह सापडला होता. 20 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण उत्तर पोलिसांनी या क्लिष्ट खुनाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे.

, mother lover murder, Chakan North Police, brutal murder Pune, son kills lover, crime investigation Pune, unidentified dead body case, Maharashtra crime news, police crime breakthrough

Murder
Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वीच सत्तारूढ पक्षनेत्यांचे कामकाज सुरू

मुंजा धोंडीबा नरहिरे (25, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. निखिल नानासाहेब चव्हाण (वय 21), उषा नानासाहेब चव्हाण (40, दोघे रा. गंगाखेड, जि. परभणी), स्वप्निल नरहरी पारधी (19, रा. खराबवाडी, ता. खेड; मूळ रा. ढोकी, ता. जि. नांदेड) यांना अटक करण्यात आले आहे.

छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह

बिरदवडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत मोकळ्या जागेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. सदर इसमाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे होते. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने डोक्यावर वार करून त्याचा खून केला होता. मृताची ओळख पटू नये, यासाठी त्याच्या चेहऱ्यावर दगडाने वार करून चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला होता. तसेच, मृताच्या खिशातील मोबाईल, ओळखपत्र व इतर वस्तू आरोपीने नेल्याने गुन्ह्याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

Murder
Leprosy Control Program: पिंपरी-चिंचवडमध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण घटले; जनजागृतीचे सकारात्मक परिणाम

20 दिवस अथक प्रयत्न

वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परिसरातील नागरिक, कंपन्यांतील कामगार, कामगार अड्डे येथे मयताचा फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नजिकच्या इतर पोलिस ठाण्यांतील मिसिंग तक्रारी तपासण्यात आल्या. मयताचे फोटोचे भिंतीपत्रके परिसरात लावण्यात आली. तसेच, सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही मयत व त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला.

Murder
Maval Zilla Parishad Election: प्रचार विरुद्ध भावनिक आवाहन, ‘पर्चेस व्होटिंग’ची चर्चा

दुचाकीमुळे सापडला धागा

तपास सुरू असताना गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी दुचाकीच्या मालकाकडे चौकशी केली असता, त्याने मित्र आरोपी निखिल नानासाहेब चव्हाण याला वापरण्यास दिल्याचे सांगितले. निखिल याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले.

मयत मुंजा धोंडीबा नरहिरे याचे आरोपी उषा नानासाहेब चव्हाण हिच्याशी अनैतिक संबंध होते. मुंजा तिला सातत्याने त्रास देत होता. आईला त्रास होत असल्याने आरोपी निखिल चव्हाण संतप्त झाला होता. त्याने आपला मित्र आरोपी स्वप्निल नरहरी पारधी याला ही बाब सांगितली. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून खून करण्याचा कट रचला.

Murder
Lonavala Tiger Point Death: लोणावळा टायगर पॉईंट येथे दरीत पडून मुंबईतील 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

दारूच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले

मयत मुंजा याला आरोपींनी गंगाखेड येथून चाकण येथे बोलावले. 7 जानेवारी रोजी सकाळी त्याला दुचाकीवर बसवून दारू पिण्याच्या बहाण्याने बिरदवडी गावच्या हद्दीतील स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे दारू पित असताना आरोपी निखिल आणि स्वप्निल यांनी कोयत्याने मुंजा याच्या डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून केला. ओळख पटू नये यासाठी डोक्यावर दगड घालून चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला. तसेच, त्याच्या जवळील सर्व वस्तू काढून आरोपी पसार झाले.

यांनी केली कामगिरी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्यासह तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, अंमलदार सुनील शिंदे, भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगताप यांनी ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news