Nilu Phule Theatre Fire Safety: निळू फुले नाट्यगृहातील अग्निसुरक्षा यंत्रणा दुरुस्त; पुढारी वृत्तानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

फायर सिलिंडर रिफिलिंग, तपासणी आणि ऑडिट पूर्ण; सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत
Nilu Phule Theatre Fire Safety
Nilu Phule Theatre Fire SafetyPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत दैनिक पुढारीने प्रकाशित केलेल्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेत तातडीने कार्यवाही केली आहे. नाट्यगृहातील सर्व अग्निशामक सिलिंडरची तपासणी करुन त्यांचे रिफिलिंग आणि नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून, सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे.

Nilu Phule Theatre Fire Safety
Pune Nagpur Bus Fare Hike: उन्हाळी सुट्ट्यांत ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; पुणे–नागपूर भाडे दुप्पट ते अडीच हजारांवर

नाट्यगृहामध्ये प्रवेशद्वार आपत्कालीन मार्ग, स्टेज परिसर, बॅकस्टेज मेकअप रूम साऊंड व लाईट विभाग, इलेक्ट्रिकल पॅनल रूम तसेच प्रेक्षक हॉलमध्ये बसविण्यात आलेल्या सीओटू, एबीसी प्रकारच्या अग्निशामक सिलिंडर्स आणि फायर बॉलची तपासणी करण्यात आली.

Nilu Phule Theatre Fire Safety
Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत भाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या आवकेत घट, कोथिंबीर-मेथी 30 ते 40 रुपयांत

त्यानंतर सर्व उपकरणे अद्ययावत करून त्यांना नव्याने वैधता देण्यात आली आहे. दररोज विविध सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक नाट्यगृहात येत असल्याने अग्निसुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Nilu Phule Theatre Fire Safety
M-Parivahan WhatsApp Scam: एम-परिवहन ॲपच्या नावाने सायबर फसवणूक; आळंदीतील व्यक्तीला ४.७६ लाखांचा फटका

या पार्श्वभूमीवर झालेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही नाट्यगृहातील अग्निसुरक्षा व्यवस्थेची नियमित तपासणी, फायर सेफ्टी ऑडिट आणि आवश्यक देखभाल वेळोवेळी करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Nilu Phule Theatre Fire Safety
Pimpri Chinchwad Police Order: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कडक शिस्त; सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीतच वास्तव्यास राहण्याचे आदेश

नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न प्रभावीपणे मांडून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी दैनिक पुढारीचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news