

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. ७) बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे प्रति जुडी 30 ते 50 रुपयांना विक्री केली जात होती. बिन्स, पावटा आणि घेवड्याचे दर तेजीतच आहेत; मात्र गवार, शेवगा स्वस्त झाला आहे. कोथिंबीर व मेथीची जुडी 30 - 40 रुपये दराने विक्री केली जात आहे.
गवार आणि शेवगा 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर वांगी, फ्लॉवरचा प्रतिकिलोचा दर 40 - 50 रुपये आहे. मिरची 50 रुपये, कांदे 100 रुपयांना पाच किलो दराने विक्री केली जात आहे. लसूण 100 - 150 रुपये, आले 80 - 90 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे:
रविवारी बाजारात गवार 70 रुपये, शेवगा 70, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 50, कोबी 30, मिरची 50, गाजर 30, शिमला 80, लसूण 100 - 120, आले 70, वांगी 70, काकडी 40, कारले 80, कांदे 20 - 25 रुपये किलो, बटाटा 25- 30, बिन्स 100 रुपये किलो, पावटा 100, लाल भोपळा 40, घोसाळी 50, दोडका 70, तोंडली 50, बीट 40, दुधी 50, घेवडा 100 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
पिंपरी बाजारातील पाले भाज्यांचे दर : (रु.) प्रति जुडी : कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30 -40, पालक 30, शेपू 30, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 40, चवळई 30, लाल माठ 30, कांदापात 50 - 60, करडई 20, आळू पाने 15 रुपये जुडी, चुका 30 रुपये.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.) :
शेवगा 80 रुपये, गवार 70 - 80, वाटाणा 120, पावटा 110, तोंडली 60, बीट 60, दोडका 80, कारली 70 -80, भरताची वांगी 40, भेंडी 80, मिरची 70, फ्लॉवर 50 - 60, कोबी 40, वांगी 70, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 60, पापडी 90 - 100, पावटा 120, सुरण 80, मद्रास काकडी 60, सिमला मिरची 80, राजमा 100, बिन्स 120 - 120, राजमा 120, गाजर 50, रताळी 50 - 60, टोमॅटो 30 - 40 रुपये, काकडी 50, बीट 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.) :
कांदा 10, बटाटा 12, लसूण 100, आले 70, भेंडी 35, गवार 35, टोमॅटो 25, वाटाणा 100, घेवडा 80, दोडका 35, हिरवी मिरची 55, दुधी भोपळा 30, काकडी 25, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 20, कोबी 15, ढोबळी 35, वांगी 25, शेवगा 35, घोसाळी 30, लिंबू 50, मका कणीस 50 रुपये प्रतिकिलो दर आहेत.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल) :
फळभाजी 5359, पालेभाजी 49000 (गड्डी), फळे आवक 821,कांदा 777, बटाटा 1514, आले 60, लसूण 7, भेंडी 82, गवार 84, टोमॅटो 595, वाटाणा 21, घेवडा 32, दोडका 15, हिरवी मिरची 125, दुधी भोपळा 56, काकडी 186, कारली 43, डांगर 75, गाजर 86, फ्लॉवर 513, कोबी 297, वांगी 171, ढोबळी 95, बीट 27, शेवगा 98, लिंबू 90, मका कणीस 59, तोंडली 16, रताळी 19 क्विंटल अशी आवक झाली.