M-Parivahan WhatsApp Scam: एम-परिवहन ॲपच्या नावाने सायबर फसवणूक; आळंदीतील व्यक्तीला ४.७६ लाखांचा फटका

व्हॉट्सॲप मेसेजद्वारे बनावट चलन दाखवून मोबाईल हॅक; क्रेडिट कार्ड वापरून चार मोबाईल खरेदी करत फसवणूक
WhatsApp Scam
WhatsApp ScamPudhari
Published on
Updated on

पिंपरी: एम-परिवहन ॲपच्या नावाने व्हॉट्सॲपवर बनावट मेसेज पाठवून एका व्यक्तीच्या मोबाईलचा अनधिकृत ताबा मिळवत ४ लाख ७६ हजार ४४ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. ५) दुपारी आळंदीतील वडगाव रोड परिसरात घडली. याप्रकरणी ५१ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Scam
Pimpri Chinchwad Police Order: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कडक शिस्त; सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीतच वास्तव्यास राहण्याचे आदेश

फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे एम-परिवहनचा मेसेज आला. त्यामध्ये त्यांच्या दुचाकीवर एक हजार रुपयांचा दंड असल्याचे दाखविण्यात आले होते. दंडाची माहिती पाहण्यासाठी त्यांनी 'व्ह्यू चलन' या पर्यायावर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड झाले व काही वेळातच स्क्रीनवरून गायब झाले.

WhatsApp Scam
Security Guards Wage Issue: पिंपरी-चिंचवडमधील सुरक्षारक्षकांचे हाल कायम; किमान वेतनाअभावी जीवन कठीण

या ॲपच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलचा अनधिकृत ॲक्सेस घेत कॉल फॉरवर्डिंग सुरू केले. त्यानंतर फिर्यादीच्या फ्लिपकार्ट खात्यावरून त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून सॅमसंग कंपनीचे चार मोबाईल खरेदी करण्यात आले. या व्यवहारातून फिर्यादींची ४ लाख ७६ हजार ४४ रुपयांची फसवणूक झाली.

WhatsApp Scam
Pimple Gurav School Issue: पिंपळे गुरवमध्ये शाळेची इमारत ५ वर्षांपासून रखडलेली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जुन्या वादातून रिअल इस्टेट एजंटला बेदम मारहाण

मित्राला झालेल्या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका रिअल इस्टेट एजंटला टोळक्याने फायटर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ५) रात्री नऊच्या सुमारास निगडीतील चिकन चौक, यमुनानगर येथे घडली.

WhatsApp Scam
Sant Tukaram Palkhi Rath: संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नवा हायटेक रथ तयार; वारीचे आकर्षण ठरणार

प्रसाद प्रभाकर गव्हाणे (२२, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर बंडु उघडे (२९), अमर जितेंद्र कसबे (२९, रा. ओटास्कीम, निगडी) आणि इतर ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news