Pimple Gurav Bus Accident: पिंपळे गुरवमध्ये उतारावरून बस सरकली; कंट्रोल केबिन आणि बसथांब्याच्या शेडला धडक

बसच्या धडकेत मोठे नुकसान; युवकाला किरकोळ दुखापत, प्रवासी आणि कर्मचारी थोडक्यात बचावले
PMPML Bus Accident
PMPML Bus AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: बसचालकाने उभी केलेली बस अचानक उतारावरून पुढे सरकली आणि थेट कंट्रोल केबिन व बसथांब्याच्या शेडला धडकली. शनिवारी (दि. १८) दुपारी पावणेएकच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बसचे, कंट्रोल केबिनचे आणि शेडचे मोठे नुकसान झाले. एका युवकाला किरकोळ दुखापत झाली. बसथांब्याजवळ प्रवासी बसची वाट पाहत असतात.

PMPML Bus Accident
Pimpri Chinchwad Drought Migrant Workers : दुष्काळामुळे मजुरांचे शहराकडे स्थलांतर; पिंपरी-चिंचवडमध्ये कामासाठी पहाटेपासून गर्दी

मात्र, सुदैवाने अपघाताच्या वेळी प्रवासी आणि कंट्रोल केबिनमधील दोन ते तीन कर्मचारी बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, या बसस्थानकातून मार्केट यार्ड, वारजे माळवाडी आणि शेवाळवाडी या मार्गांवर बसेस धावतात. दुपारी पावणेएकच्या सुमारास चालकाने बस कडेला उभी केली.

PMPML Bus Accident
Pimpri Chinchwad BRTS Cleaning: पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी बॅरिकेड्सच्या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर

त्यानंतर तो वाहकासोबत जेवणासाठी गेला. दरम्यान, बस उभी असलेल्या ठिकाणच्या उतारामुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे बस अचानक पुढे सरकली. चालकाचे नियंत्रण नसल्याने बस थेट कंट्रोलरच्या केबिनला आणि बस थांब्याच्या शेडला जाऊन धडकली. या धडकेत बसच्या काचा फुटल्या, तर केबिन आणि शेडचेही नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात एकच धावपळ उडाली.

PMPML Bus Accident
Pune Graduate Constituency Election: स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी वडगावमध्ये निर्धार

वाहन पार्क करताना खबरदारी गरजेची

बस उभी करताना हँडब्रेक लावणे, योग्य ठिकाणी वाहन पार्क करणे आणि आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी बसचालकांनी अधिक दक्षता घ्यावी आणि प्रशासनाने वाहन पार्किंगच्या सुरक्षेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची चौकशी करून कारवाई होणे अपेक्षित आहे.

PMPML Bus Accident
Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी भाजपची रणनीती

प्रवासी, कर्मचारी थोडक्यात बचावले

कंट्रोल केबिनच्या शेजारीच बस थांबा असल्याने तेथे अनेक प्रवासी बसची वाट पाहत बसलेले असतात. तसेच, केबिनमध्येही कर्मचारी कार्यरत असतात. अपघाताच्या वेळी प्रवासी आणि केबिनमधील दोन ते तीन कर्मचारी बाहेर असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले. बसच्या मार्गात प्रवासी असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र या घटनेमुळे बसस्थानकातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news