Pimple Gurav Traffic Congestion: पिंपळे गुरवमधील ‘८ टू ८०’ उद्यानाला वाहतूक कोंडीचा विळखा; पीएमपीएमएल बससेवाही विस्कळीत!

सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
8 To 80 Garden Illegal Parking
8 To 80 Garden Illegal ParkingPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौकाजवळ असलेले व परिसरातील नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरलेले '८ टू ८०' उद्यान सध्या गंभीर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. संध्याकाळच्या वेळी उद्यानात येणाऱ्या पर्यटकांची तुफान गर्दी, रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे या मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, सामान्य नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

8 To 80 Garden Illegal Parking
Pimpri Chinchwad Illegal Parking: चिंचवडमध्ये मेट्रो स्थानक परिसरात अनधिकृत पार्किंगचा विळखा; पादचाऱ्यांची कोंडी!

उद्यानात दररोज शेकडो नागरिक कुटुंबीयांसह विरंगुळ्यासाठी येतात. उद्यान परिसरात पाणीपुरी, खेळणी व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी असते. उद्यानाजवळ पार्किंगची व्यवस्था असली, तरी गर्दीच्या मानाने ती अपुरी पडत आहे. परिणामी, अनेक वाहनचालक आपली दुचाकी व चारचाकी वाहने थेट रस्त्याच्या कडेला किंवा मध्यभागीच उभी करून निघून जातात.

8 To 80 Garden Illegal Parking
Pavana Closed Pipeline Project: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प घाईत राबवू नका; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला इशारा!

पिंपळे सौदागरकडून सुदर्शन चौकाकडे येणारा मार्ग आधीच अरुंद पुलावरून जात असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच या बेशिस्त पार्किंगमुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. दररोज सायंकाळी ५ ते रात्री ८ या गर्दीच्या वेळी या परिसराला जणू वाहतूक कोंडीचे ग्रहणच लागलेले असते.

8 To 80 Garden Illegal Parking
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांची दहशत; मेट्रो स्थानके, उद्यानांत नागरिकांमध्ये भीती!

पीएमपीएमल प्रवासी त्रस्त

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पीएमपीएमलच्या सार्वजनिक बससेवेला बसत आहे. आकुर्डी आणि पिंपरी परिसरातून सुदर्शन चौक मार्गे पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या बसला या रस्त्यावरून वाट काढताना बसचालकांची मोठी कसरत होते. रस्त्याच्या मध्येच उभा असलेल्या वाहनांमुळे अनेकदा बस व इतर वाहने समोरासमोर अडकून पडतात आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊन त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

8 To 80 Garden Illegal Parking
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा उद्रेक; प्लेटलेट्सचा साठा संपला, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ!

सुदर्शन नगरमधील ८ टू ८० उद्यानाजवळ बसच्या नियमित मार्गावर बेकायदेशीरपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. बसच्या मार्गावर वाहने लावल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने पार्किंगसाठी निश्चित केलेल्या जागेतच लावावीत. यामुळे बस बरोबर इतर वाहनांचा मार्ग मोकळा राहून वाहतूक सुरळीत सुरू राहील या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

शाम जगताप, नगरसेवक, पिंपळे गुरव.

सुदर्शन चौक आणि ८ टू ८० उद्यान परिसरातील वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांवर टोइंग आणि दंडात्मक कारवाई तीव्र केली जाईल. नागरिकांनी आपली वाहने पार्किंग परिसरातच लावावीत.

चंद्रकांत वाबळे, वाहतूक पोलिस निरीक्षक, सांगवी विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.