Pavana Closed Pipeline Project: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प घाईत राबवू नका; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला इशारा!

खांडी-कुसूरमधील वृक्षतोडीलाही विरोध; स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पांबाबत निर्णय घेण्याची मागणी
Pavana Closed Pipeline Project
Pavana Closed Pipeline ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प घाईगडबडीत राबवू नका. तसेच, काही उद्योगपतींना खूश करण्यासाठी खांर परिसरात वृक्षतोड सुरू आहे. दोन्ही प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करावी आणि त्यांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

Pavana Closed Pipeline Project
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांची दहशत; मेट्रो स्थानके, उद्यानांत नागरिकांमध्ये भीती!

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तसेच खांडी-कुसूर परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध दर्शवत त्यांनी सरकारवर टीका केली. या दोन्ही विषयांवर तळेगाव दाभाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला आपण मुख्यमंत्री असताना स्थगिती दिली होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

Pavana Closed Pipeline Project
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा उद्रेक; प्लेटलेट्सचा साठा संपला, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ!

विहिरी कोरड्या पडण्याची भीती

तळेगाव शहरासह मावळ तालुक्यात नागरीकरण आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची मागणीही वाढणार आहे. स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे.

Pavana Closed Pipeline Project
Moshi Dengue Case: मोशीत डेंग्यूचा बळी; आदर्शनगरमधील ३६ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

आपण मुख्यमंत्री असताना पाणीवाटपाचा क्रम प्रथम पिण्यासाठी, त्यानंतर शेतीसाठी आणि शेवटी उद्योगांसाठी असा निश्चित केला होता, असे चव्हाण यांनी सांगितले. बंदिस्त जलवाहिनीमुळे बाष्पीभवन टळेल, असे सांगितले जात असले तरी त्यामुळे परिसरातील विहिरी कोरड्या पडण्याची आणि शेतीवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

Pavana Closed Pipeline Project
Diwali Akash Kandil: पैठणी, खण, पारंपरिक आकाश कंदिलचा झगमगाट

स्थानिकांना विश्वासात घेऊन वृक्षतोड करा

हरित ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणे ही विसंगत बाब असल्याचे सांगत कर्जत, भीमाशंकर तसेच खांडी-कुसूर परिसरातील वृक्षतोड तातडीने थांबवण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात केंद्र सरकारलाही कळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करावी आणि त्यांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला यशवंत मोहोळ, विशाल वाळुंज, दिलीप ढमाले, गणेश काजळे, शांताराम नरवडे, रोहिदास वाळुंज तसेच मावळ तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.