PCMC Standing Committee BJP: पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा नवा पॅटर्न; स्थायी समितीत नवख्या चेहऱ्यांना संधी

अनुभवी दिग्गजांना डावलून नव्या नगरसेवकांकडे तिजोरीची जबाबदारी; ४,००५ कोटी दायित्वाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक शिस्तीचा निर्धार
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: नवनिर्वाचित नगरसेवकांना स्थायी समितीसह विविध विषय समितीमध्ये संधी देत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपने नवीन पॅटर्न राबविला आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देत दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना पक्षश्रेष्ठींनी दूर सारले आहे. नव्या कारभाऱ्यांमार्फत महापालिकेला आर्थिक शिस्त लावून उत्पन्नाचे नवनवे स्त्रोत निर्माण करण्याचा धोरण सत्ताधाऱ्यांचे दिसत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Sunil Shelke EVM Allegation: “अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा; पुरावे न्यायालयात देतो!” – आमदार सुनील शेळके यांचे भाजपला खुले आव्हान

अभिषेक बारणे हे पूर्वी स्थायी समितीमध्ये सदस्य होते. शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन या सर्व दहा जणांना प्रथमच स्थायी समितीमध्ये संधी दिली गेली आहे. संदीप कस्पटे, योगिता नागरगोजे, बाबासाहेब त्रिभुवन हे दुसऱ्यांदा निवडून आले असून, उर्वरित सात जण पहिल्यांदा नगरसेवक झाले आहेत. भाजपने नवख्यांना संधी देत त्यांच्यावर महापालिकेच्या तिजोरीची राखण करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Daryapati Shivray Exhibition Lonavala: लोणावळ्यात ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शनाची भव्य मेजवानी; शिवकालीन आरमाराचा इतिहास जिवंत

प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात आल्याने महापालिकेच्या तिजोरीत खणखणाट असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती तसेच, गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी या नव्या कारभाऱ्यावर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने ते पावले उचलतील. तसेच, महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी उत्पन्नाच्या नवीन स्त्रोताचा विचार करून त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष कोण ?

स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड शुक्रवारी (दि. 20) करण्यात आली. त्यात सत्तारूढ भाजपचे 11 सदस्य आहेत. सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीचे सदस्य झालेले थेरगावाचे नगरसेवक अभिषेक बारणे हे अध्यक्ष होतील, अशी शक्यता अधिक आहे. तसेच, दुसऱ्यांदा नगरसेवक झालेले बाबासाहेब त्रिभुवन, योगिता नागरगोजे, संदीप कस्पटे यांची ही अध्यक्षपदी वर्णी लागू शकते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC Police: डायल 112 ची धडाकेबाज कामगिरी; आयटी हब हिंजवडीत अवघ्या 4.34 मिनिटांत पोलिस मदत

दिग्गज, अनुभवी मंडळींना धक्का

भाजपने नव्यांना संधी देत दिग्गज आणि अनुभवी मंडळींना धक्का दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजयाची हॅट्रटिक करणारे निष्ठांवत गटाचे शीतल शिंदे, शिवसेनेतून भाजपत आलेले माजी गटनेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नवनाथ जगताप, हर्षल ढोरे या अनुभवी मंडळींना संधी दिली गेली नाही. दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना यंदा संधी न देता, नव्यांने मार्गदर्शन करण्याचा सल्ला पक्षाकडून देण्यात आला आहे. नवखे आणि अनुभवी यांची सांगड घालत महापालिकाचा पुढील कारभार कसा असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

'दैनिक पुढारी'ने दिले होते संकेत

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. चार वर्षांतील प्रशासकीय राजवटीत मोठ्या खर्चिक कामांचा सपाटा लावण्यात आला होता. परिणामी, महापालिकेवर तब्बल 4 हजार 5 कोटी रुपयांचे दायित्व आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने महापालिका तिजोरीत खणखणाट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी स्थायी समिती अध्यक्षपद घेण्यास अनेक अनुभवी नगरसेवकांनी नकार दिला होता. त्यासंदर्भात दैनिक पुढारीने स्थायी अध्यक्षपद नको रे बाबा, असे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या बातमीची शहरभरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Voluntary Retirement PCMC: महापालिकेत स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा सिलसिला कायम; शहर अभियंता मकरंद निकम यांची स्वेच्छानिवृत्ती

यांचा स्थायी समितीमध्ये प्रवेश

अभिषेक बारणे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, योगिता नागरगोजे हे दुसऱ्यांना निवडून आले आहेत. त्यांना स्थायी समितीमध्ये संधी दिली आहे. मनिषा चिंचवडे, सारीका गायकवाड, कृष्णा सुरकुले, शीतल वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष असलेल्या शालिनी गुजर हे प्रथमच नगरसेवक झाले आहेत. अभिषेक बारणे वगळता सर्व 10 जण प्रथमच स्थायी समितीमध्ये प्रवेश करत आहेत. नव्या कारभाऱ्यांच्या हातात थेट महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत.

विषय समित्यांमध्येही नवख्यांचा भरणा

सत्तारुढ भाजपने विविध विषय समित्यांवर नवख्या नगरसेवकांना मोठ्या संख्येने संधी दिली आहे. क्रीडा समितीमधील सर्व सहा जणांनी प्रथमच महापालिका सभागृहात प्रवेश केला आहे.शिक्षण समितीमधील सारिका बोऱ्हाडे वगळता उर्वरित पाच जण हे प्रथमच निवडून आले आहेत. महिला व बालकल्याण समितीमधील नीता पाडाळे वगळता सर्व पाच जण हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. विधी समितीमधील सहापैकी विनायक गायकवाड वगळता सर्व पाच जण हे प्रथमच निवडून आले आहेत. शहर सुधारणा समितीमधील सहापैकी तीन जण पहिल्यांदा निवडून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news