

लोणावळा : जयहिंद लोक चळवळ या सामाजिक संस्थेच्या वतीने लोणावळा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 व 20 फेबुवारी रोजी दर्यापती शिवराय, मराठा आरमार व इतिहासकालीन युद्ध नौकांचे भव्य प्रदर्शन लोणावळा नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक 1 या ठिकाणी भरविण्यात आले आहे. याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जयहिंद लोक चळवळीचे प्रमुख निखिल कविश्वर, शुभम जोशी व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी करण्यात आले.
सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्व वयोगटातील नागरिकांना पाहण्यासाठी मोफत खुले असणार आहे. इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी या प्रदर्शनातील गलबते व लढाऊ जहाजे यांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.