Voluntary Retirement PCMC: महापालिकेत स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा सिलसिला कायम; शहर अभियंता मकरंद निकम यांची स्वेच्छानिवृत्ती

वैद्यकीय कारणास्तव निर्णय; प्रशासकीय काळातील कामांच्या चौकशीच्या चर्चांना उधाण
PCMC
PCMCRed Zone Map
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. वैद्यकीय कारणामुळे त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्या अर्जाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजुरी दिली असून, ते 28 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.

PCMC
Bhosari Drone Cluster: भोसरी एमआयडीसीत ड्रोन क्लस्टरला वेग; 40 कंपन्यांची गुंतवणुकीस उत्सुकता

प्रशासकीय राजवटीतील चार वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात खर्चिक विकासकामे व प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ती कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्या बेसुमार कामे आणि खर्चाच्या प्रमाणावरून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महापालिकेच्या कारभारावर थेट टीका केली होती. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामांना मंजुरी दिल्याचा आरोपही त्यांनी जाहीरपणे केला होता. तसेच, विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रशासकीय राजवटीतील कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

PCMC
Lonavala Land Fraud Case: कुरवंडे येथील ५३ एकर जमिनीवर बनावट कागदपत्रांचा प्रकार; ९ जणांवर गुन्हा

प्रशासकीय काळात मंजुरी दिलेल्या सर्व कामांची लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात चौकशी होऊ शकते. चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची भीती अधिकाऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे महापालिकेचे अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुढील आयुष्य आनंदीत घालविण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.

PCMC
Purandar Airport Project: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती; भूसंपादनासाठी ₹6 हजार कोटींच्या कर्जास मंजुरी

निवृत्ती घेणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहर अभियंता मकरंद निकम यांनी वैद्यकीय कारणांमुळे स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे सांगितले आहे. त्याचा अर्ज आयुक्त हर्डीकर यांनी स्वीकारला असून, ते 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news