PCMC Free Sanitary Pads: पिंपरी-चिंचवडच्या महापालिका शाळांतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड; ७९.६७ लाखांच्या खर्चाला मंजुरी

सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशिन बसविणार; ११ हजार १९३ विद्यार्थिनींना मिळणार सुविधा
Sanitary Pad Vending Machine
Sanitary Pad Vending MachinePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड दिले जाणार आहे. त्यासाठी शाळेत सॅनिटरी पॅड व्हेडिंंग मशिन, डिस्पोजल मशिन बसण्यात येणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपये खर्चास तसेच, इतर विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. बुधवारी (दि. २५) झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे होते. बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Sanitary Pad Vending Machine
Majha Varg Teachers App: शिक्षकांचा कागदोपत्री ताण होणार कमी; ‘माझा वर्ग’ ॲपमुळे निकाल, नोंदी अन् अहवाल काही मिनिटांत!

महापालिकेच्या माध्यमिक शाळेत सहावी ते दहावीच्या वर्गात एकूण ११ हजार १९३ विद्यार्थिनी आहेत. त्यांच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना महापालिकेकडून मोफत सॅनिटरी पॅड पुरवले जाणार आहेत. त्यासाठी सर्व माध्यमिक शाळांमधील मुलींच्य स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड मशिन बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ लाखांचा खर्च आहे. वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी १८ लाख रुपयांचे डिस्पोजल मशिन बसण्यात येणार आहेत. सॅनिटरी पॅड्स पुरवठा करण्यासाठी ४३ लाख १७ हजार ४८० रुपये खर्च केला जाणार आहे. विद्यार्थिनींना समुपदेशन करण्यासाठी ३ लाख ५० हजार असे एकूण ७९ लाख ६७ हजार ४८० रुपये खर्च केला जाणार आहे. त्या खर्चास समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.

Sanitary Pad Vending Machine
Maval Illegal Mining: मावळात ३०० फूट खोल बेकायदा उत्खननाचा आरोप; स्फोटके वापरल्याची शेतकऱ्याची तक्रार

जलतरण तलाव सुरू करण्याच्या सूचना

शहर परिसरात पुरेसा पाऊस झाला आहे. पवना धरणात १०० टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे सर्व जलतरण तलाव तत्काळ सुरू करण्यात यावेत. निर्माल्य रथ फिरवा. सायकल ट्रॅक पदपथ मिसिंग असल्यास ते तत्काळ जोडावेत. पदपथ मोकळे करण्यासाठी हॉकर्स झोन धोरण मंजुरीसाठी सादर करावे. गणेशोत्सवात निर्माल्य जमा करण्यासाठी फिरता रथ उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिले आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांकडून सर्रासपणे केला जात आहे. त्याबाबत आरोग्य विभागाने कारवाई करावी. नागरिकांनी प्लास्टिकऐवजी कापडी पिवश्यांचा वापर करावा, अशी सूचना समितीचे सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांनी केली.

Sanitary Pad Vending Machine
Pimpri Chinchwad Swine Flu: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धोका; १९ रुग्ण आढळले, महापालिकेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

ताब्यात आलेल्या जागांवर पार्किंग सुरू करणार

शहरात अनेक जागांवर आरक्षण आहे. जागा ताब्यात येऊनही त्याचा वापर केला जात नाही. काही जागा पडून आहेत. तर, काही जागांवर अतिक्रमण झाले आहे. काही जागांवर उभारण्यात आलेल्या इमारती व बांधकाम हे धोकादायक झाले आहे. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचा विचार आहे. त्यासंदर्भात माहिती नगर रचना, भूमि आणि जिंदगी तसेच, स्थापत्य विभागाने समितीसमोर सादर करावी, असे निर्देश समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दिले आहेत.

Sanitary Pad Vending Machine
SIM Swap Cyber Fraud: ‘नेटवर्क गेले’ म्हणून दुर्लक्ष करू नका; सिम स्वॅपने सायबर चोरट्यांचा लाखोंचा डल्ला!

रस्त्यांसह वैद्यकीय कामांना मान्यता

पुनावळे बीआरटी रस्त्यापासून पुनावळे गावठाणापर्यंत १८ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यासाठी २५ कोटी वाढीव खर्च आहे. विशालनगर, पिंपळे निलख येथील गणपती चौक ते छत्रपती बँक ते साईश्री कॉलनी या १२ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २५ लाख रुपयांचा खर्च आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सर्जरी विभागासाठी निगेटिव्ह प्रेशर ऊंड थेरपी मशीनसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी ९ लाख ३५ हजार खर्च आहे. महापालिका दवाखाने व रुग्णालयांसाठी अ‍ॅलोपॅथिकची १ कोटी ८० लाख रुपयांची औषधे खरेदी करणे. वाकड येथील नर्सिंग वसतीगृहास मेस्कोचे चार सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांना भाडे तत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यासाठी ८० लाख ५२ हजार रुपये खर्च आहे. महापालिकेकडून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे विविध प्रकारचे मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. त्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news