Pimpri Chinchwad Swine Flu: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धोका; १९ रुग्ण आढळले, महापालिकेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाचा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या; स्वतःहून औषधे घेणे टाळा
Swine Flu H1N1
Swine Flu H1N1Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: वातावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.

Swine Flu H1N1
SIM Swap Cyber Fraud: ‘नेटवर्क गेले’ म्हणून दुर्लक्ष करू नका; सिम स्वॅपने सायबर चोरट्यांचा लाखोंचा डल्ला!

ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून, सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच, श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे आढळू शकतात.

Swine Flu H1N1
Pimpri Chinchwad Housing Societies: खासगी सोसायट्यांवर एसटीपी-कंपोस्टची सक्ती; महापालिका गृहप्रकल्पांना मात्र नियमांचा अपवाद?

एक जानेवारी २०२६ पासून शहरात इन्फ्लुएंझा (एच-१ एन-१) बाधित १९ रुग्ण आढळून आले आहेत. योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला व उपचारांमुळे या कालावधीत एकही जीवितहानी झालेली नाही. तरी नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत अनावश्यक भीती न बाळगता वेळेत जवळच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

Swine Flu H1N1
Dapodi Traffic Jam: दापोडी-फुगेवाडीत वाहतूक कोंडीचा विळखा; खड्डे, अतिक्रमण अन् रखडलेल्या कामांनी वाहनचालक हैराण

अशी घ्या काळजी

  • सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.

  • पोषक व संतुलित आहार घ्यावा.

  • धूम्रपान टाळावे.

  • शरीराला पुरेशी झोप व विश्रांती द्यावी.

  • शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी पुरेसे पाणी प्यावे.

  • आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.

  • आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.

  • खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने अथवा टिश्यूने झाकावे. त्यानंतर हातांची स्वच्छता राखावी.

Swine Flu H1N1
Dehu Road Highway Encroachment: देहूरोडमध्ये महामार्गाला अतिक्रमणांचा विळखा; वाहतूक कोंडीसोबत अपघातांचा धोका वाढला

स्वत:हून औषधे घेऊ नका

ताप, सर्दी, खोकला किंवा घसादुखी यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार करू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधांचा वापर करावा. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लू आजारासाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. वातावरणातील बदलाच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या तसेच, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news