PCMC General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बंद; सत्ताधाऱ्यांवर नामुष्की

ऑनलाईन प्रसारणामुळे अडचणी वाढल्याने थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय; सोमवारीची सभा लाईव्ह नाही
Live Conferencing
Live ConferencingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना समजावे म्हणून सत्ताधारी भाजपने सभा कामकाजाचे ऑनलाईन प्रक्षेपण सुरू केले होते. मात्र, ऑनलाईन सभा कामकाजामुळे सत्ताधारीच अडचणीत येत असल्याने तो प्रकार बंद करण्याची नामुष्की सत्ताधार्‍यांवर ओढवली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 15) होणार्‍या सर्वसाधारण सभेचे थेट प्रेक्षपण (लाईव्ह) केले जाणार नाही.

Live Conferencing
Play School Safety: पिंपळे गुरवमध्ये प्ले-स्कूल व डे-केअर केंद्रांवर नियमभंगाचा संशय; सर्वेक्षणाची मागणी

महापालिकेत दुसर्‍यांदा भाजपची सत्ता आली आहे. नवे कारभारी महापालिकेत आल्याने सर्वसाधारण सभेचे कामकाज ऑनलाईन केले जावे, अशी मागणी वाढली होती. त्याची दखल घेऊन महापौर रवी लांडगे यांनी आयुक्तांना सभा कामकाजाचे थेट प्रेक्षपण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सभागृहाचे कामकाज ऑनलाईन करण्यात येत आहे. सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना समजावे म्हणून सत्ताधारी भाजपने तो निर्णय घेतला होता.

Live Conferencing
Indrayani River Pollution: इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; देहूगावात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न

सभेच्या थेट प्रेक्षपणामुळे नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते तसेच, नगरसेवकांच्या समर्थकांना नगरसेवक काय बोलले हे समजत होते. तर, कोणता नगरसेवक कोणत्या विषयावर कसा बोलत आहे, हे ही संपूर्ण शहरासमोर येत होते. तसेच, सभा कामकाजात नगरसेवक किती सहभाग घेतो, हे नागरिकांसह मतदारांना कळत होते. काही नगरसेवक थेट प्रेक्षपणातील स्वत:चा स्वतंत्र व्हिडीओ तयार करून त्याचे रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता.

Live Conferencing
Sanitation Workers Safety PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेला अनुसूचित जाती आयोगाची नोटीस; सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न

ऑनलाईन सभेमुळे भाजप पदाधिकारी अडचणीत

ऑनलाईन सभेमुळे फायदा होण्यापेक्षा अनेकदा सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी अडचणीत सापडले होते. त्यामुळे महापौरांवर थेट दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. थेट प्रक्षेपणाचा प्रकार सत्ताधार्‍यांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी सभा कामकाज ऑनलाईन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यापुढे सभा ऑनलाईन पाहता येणार नाही.

Live Conferencing
PCMC School Reopen: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा १५ जूनपासून सुरू; प्रवेशोत्सवाने होणार स्वागत

सोमवारच्या सभेचे थेट प्रक्षेपण नाही

अर्थसंकल्प सादर करण्यात येणार होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. नियमित होणार्‍या मासिक सर्वसाधारण सभेचे थेट प्रेक्षपण केले जाणार नाही. येत्या सोमवारी (दि. 15) होणार्या सर्वसाधारण सभेचे ऑनलाईन प्रेक्षपण केले जाणार नाही, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news