PCMC Charholi TDR Controversy: चऱ्होली एसटीपी जागेचा टीडीआर वाद; 59 कोटींचा मोबदला थेट 213 कोटींवर

17 वर्षांनंतर वाढीव रेडिरेकनर दराने टीडीआर वाटप; नगररचना विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
TDR
TDRPudhari
Published on
Updated on

पिंपरी: चऱ्होली येथील एक खासगी जागा मैलासांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रासाठी (एसटीपी) सन 2008 ला ताब्यात घेण्यात आली. त्याच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचा निर्णय तब्बल 17 वर्षांनंतर म्हणजे ऑगस्ट 2025 ला घेण्यात आला. मात्र, रेडिरेकनरचा 673 रुपये चौरस फूट असलेला दर तब्बल 1 हजार 210 रुपये चौरस फूट एवढा करून 59 कोटी रुपयांऐवजी 213 कोटी रुपयांचा मोबदला त्या माध्यमातून दिला गेला. महापालिकेच्या नगर रचना विभागाच्या टीडीआर वाटपातील या आर्थिक हितसंबंधांच्या व्यवहारावरून शंका उपस्थित केली जात आहे.

TDR
PCMC Website Leadership Update Issue: महापौर बदलले, पण संकेतस्थळावर आयुक्तच ‘बॉस’; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा डिजिटल गोंधळ उघड

महापालिकेने सन 2008 ला चऱ्होली येथील सर्व्हे क्रमांक 33 येथील 11 लाख 74 हजार 62 चौरस फूट जागेवर एसटीपीचे आरक्षण टाकण्यात आले. त्या जागेचा मोबदला भूसंपादन नियमानुसार घेणार नसून, तो टीडीआर स्वरूपात घेऊ असे जागा मालकाने लेखी दिले होते. त्या नियमाकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

TDR
Dapodi Faugewadi Traffic Congestion: दापोडी–फुगेवाडी प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

त्या जागेच्या टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबदला देताना टीडीआर देताना रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली. मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांनी चर्होली येथील जागेचा 673 रुपये प्रतिचौरस फूट असलेला रेडिरेकनरचा दर तब्बल 1 हजार 210 रुपये प्रतिचौरस फूट इतका वाढवला. तो निर्णय 18 ऑगस्ट 2025 रोजी घेण्यात आला. तो निर्णय एका राजकीय व्यक्तीमुळे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या निर्णयात तसे नमूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

TDR
Charholi Indrayani River Pollution: चऱ्होलीत इंद्रायणी नदीवर फेसांचा सडा; नदी की बर्फ? नागरिक हैराण

जागामालकाला 154 कोटी रुपयांचा फायदा

त्या निर्णयाच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टीडीआर समितीने जागामालकाला 11 लाख 74 हजार 62 स्क्वेअर फूट जागेचा टीडीआर देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी असलेला 673 रुपये चौरस फूट दराऐवजी 1 हजार 210 रुपये चौरस फूट दराने मोबदला दिला गेला. त्या वाढीव दराने संबंधित जागामालकास टीडीआर देण्यात आला. त्यामुळे त्या जागेचा पूर्वी असलेला 59 कोटी 17 लाख 27 हजार 248 रुपयांचा मोबदला नव्या वाढीव दरामुळे 213 कोटी 9 लाख 22 हजार 530 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे जागामालकास तब्बल 154 कोटी रुपयांचा अधिकचा फायदा झाला आहे.

TDR
Vadgaon Maval Builder Fraud Case: वडगाव मावळमध्ये बिल्डरचा धक्कादायक घोटाळा; गहाण सदनिका अनेकांना विकल्या

चऱ्होली येथील ठराविक जागेचा रेडीरेकनर दर वाढवून महापालिकेकडून वाढीव दराने मोबदला दिल्या गेल्याबद्दल तसेच, सन 2008 मध्ये जागा ताब्यात घेतली असताना 17 वर्षांनंतर आजच्या दराने टीडीआर देण्यात आल्याने नगर रचना विभागाच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या वाढीव टीडीआर वाटप प्रकरणावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्या प्रकरणासंदर्भात सर्व व्यवहार आमचे वकील पाहतात, ते तुमच्याशी बोलतील, असे जागामालक नीलेश कलाटे यांनी सांगितले.

नियमानुसार टीडीआरचे वाटप रेडिरेकनरचे दर आम्ही ठरवत नाही. संबंधित विभागाकडून ठरलेल्या रेडिरेकनर दरानुसार चऱ्होली येथील जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्यात आला आहे. ती प्रक्रिया नियमानुसार झाली आहे.

किशोर गोखले, उपसंचालक, नगर रचना विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news