Dapodi Faugewadi Traffic Congestion: दापोडी–फुगेवाडी प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

अनधिकृत पार्किंग, उलट्या दिशेने वाहतूक व अपूर्ण रस्तेकामांमुळे जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर खोळंबा
Dapodi Faugewadi Traffic
Dapodi Faugewadi TrafficPudhari
Published on
Updated on

दापोडी: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी आणि फुगेवाडी प्रवेशद्वार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुगेवाडी व कासारवाडीतील अरुंद अंतर्गत रस्ते तसेच महामार्गाबाहेर पडताच वाहनांच्या रांगा लागणे, यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Dapodi Faugewadi Traffic
Charholi Indrayani River Pollution: चऱ्होलीत इंद्रायणी नदीवर फेसांचा सडा; नदी की बर्फ? नागरिक हैराण

परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी ही उपनगरे महामार्ग लगत असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि विकासकामांना होणाऱ्या विलंबामुळे हा परिसर वाहतूक कोंडीने त्रस्त झाला आहे. दापोडी येथील पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी अनेक वाहनचालक उलट्या दिशेने येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच दापोडी मेट्रोस्थानक परिसरात काही प्रवासी रस्ता ओलांडण्याऐवजी विरुद्ध दिशेने प्रवास करत असल्याचे चित्र दिसते. एका हॉटेल परिसरात महामार्गालगत अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

Dapodi Faugewadi Traffic
Vadgaon Maval Builder Fraud Case: वडगाव मावळमध्ये बिल्डरचा धक्कादायक घोटाळा; गहाण सदनिका अनेकांना विकल्या

याशिवाय दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी रस्त्यावर अनेक दिवसांपासून उभी असलेली बंद वाहनेही वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. परिणामी दापोडी रेल्वे स्थानकापासून फुगेवाडी व कासारवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून, प्रवासाचा खोळंबा होत आहे. दरम्यान बीआरटी महामार्गावर रस्त्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अर्धवट कामांमुळे महामार्गावरील रस्ता अरुंद झाला आहे. खोदलेले रस्ते राडारोडा व धुळीमुळे नागरिक व व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. ही कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Dapodi Faugewadi Traffic
Lonavala Garbage Depot Odor Issue: लोणावळ्यात कचरा डेपोची दुर्गंधी असह्य; ग्रामस्थांचा टाळे ठोकण्याचा इशारा

अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष

रस्त्यात होणारे अनधिकृत पार्किंग व विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक यावर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी करणे गरजेचे आहे. अनधिकृत पार्किंगमुळे रस्ता अरुंद होत आहे. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दापोडी व फुगेवाडीतील नागरिकांनी दिला आहे.

बंद वाहने ठरताहेत अडथळा

दापोडी येथील पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनचालक विरुद्ध दिशेने येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच मेट्रो स्थानक परिसरात काही प्रवासी रस्ता ओलांडणे ऐवजी विरुद्ध दिशेने जात असल्याचे चित्र दिसते. हॉटेल परिसरात महामार्गालगत अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील उभी असलेली बंद वाहने हे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. यावर वाहतूक प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.

Dapodi Faugewadi Traffic
Women Transport Driver Training Maharashtra: प्रवासी वाहतूक व्यवसायात महिलांची एन्ट्री; 60 जणींना मोफत टुरिस्ट लायसन्स प्रशिक्षण

महामार्गावर विकासकामे सुरू असल्याने काही मर्यादा येत आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनावर व अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

दीपक साळुंखे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

दापोडी व फुगेवाडी परिसरातील पेट्रोल पंप आणि मेट्रो स्थानकाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. रस्त्यांवरील कामे लवकर पूर्ण करावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करावी.

रवींद्र कांबळे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news