

पिंपरी : येत्या 2047 पर्यंत हिंदु राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनविण्याचा मोठा डाव आहे. त्याला गजवा ए हिंद म्हणून नाव देखील दिले आहे. त्यामुळे आपण सगळे सजग रहा. दुकानात संशय आल्यास चौकशी करा, आधार कार्ड तपासा.
कारण, वेगवेगळया व्यवसायातून कमावलेले पैसे ते जिहादासाठी वापरतात. त्यासाठी बारकाईने लक्ष द्या, असे आवाहन राज्याचे मत्सव्यवसाय, बंदरे मंत्री नितीश राणे यांनी केले.
चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळयाप्रसंगी एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री राणे बोलत होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, अॅड. मोरेश्वर शेडगे, कुणाल साठे, महेश मिरजकर, हिंदु कन्या मुक्ता यासह स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होेते. या वेळी चिंचवडचा राजा सार्वजनिक मंडळाच्या वतीने मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.
मंत्री राणे म्हणाले की, हिंदु राष्ट्रामध्ये कोणतेही जात, धर्म व पंथ नाही. केवळ हिंदू म्हणूनच हित पाहिले जाते. हिंदू म्हणून सर्वात महत्त्वाचे काय केले पाहिजे तर, दुसऱ्या हिंदुंना ताकद कशी देता येईल, हे पाहिले पाहिजे.
त्यामुळे बाजारात वस्तुंची खरेदी करताना हिंदू दुकानादारांकडूनच करावी. हीच आपली मूळ संकल्पना आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. येत्या 2047 पर्यत हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा मोठा डाव आहे. जिहाद वाढविण्यासाठी कार्य त्या माध्यमातून सुरु आहे. त्याला गजवा ए हिंद म्हणून नाव दिले आहे.
त्यामुळे दुकानात जाऊन अनेकदा चौकशी करत जा, त्याचे आधार कार्ड तपासा, ते नीट पहा. कारण, अशा प्रकारे विविध व्यवसयातून मिळवलेला पैसा हा जिहादसाठी वापरला जातो, त्या कडे बारकाईने लक्ष द्या, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले.