Yerwada Burning Car Incident: शास्त्रीनगरमध्ये बर्निंग कारचा थरार! धावत्या कारला अचानक आग

इंजिनमधून धूर दिसताच वाहनचालकाने प्रवाशांना सुरक्षित उतरवले; अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आग विझवली
Yerwada Burning Car Incident
Yerwada Burning Car IncidentPudhari
Published on
Updated on

येरवडा : येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात शुक्रवारी (ता. ०५) रोजी संध्याकाळी नऊच्या दरम्यान बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला.

Yerwada Burning Car Incident
Cold Wave in Maharashtra: गार वाऱ्यांनी वाढवली थंडी! नागपूर ९.६, पुणे १४.१ अंशांवर

नगरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. या वाहनातून चार प्रवासी प्रवास करीत होते सर्व प्रवासी सुखरूप असून या घटनेत कोणीही जखमी नसल्याचे अग्निशमन केंद्राचे प्रभारी उप अग्निशमन अधिकारी नवनाथ वायकर यांनी दिली.

Yerwada Burning Car Incident
PMC City Engineer Appointment: शहर अभियंतापदी पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची वर्णी

या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या वेळी ड्राइवर रघुनाथ भोईर, फायरमन छगन मोरे, श्रीराम कराड, आदिनाथ फेगडे, पंकज पवार यांनी काम पाहायचे. नगरच्या दिशेने जाणारी 'टाटा नेक्सन' (एमएच १२ व्ही एल २८४६) हिच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे वाहनचालकाच्या निदर्शनास आल्याने वाहनचालकाने सर्वांना सुखरूप खाली उतरवले आणि अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. वाहन घटनास्थळी दाखल होतच अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.                       

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news