Independent Election Strategy: राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा नारा! अजित पवारांचा सकारात्मक संकेत

मुंबई बैठकीत कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर — पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व शिंदे गटाविरुद्ध राष्ट्रवादी स्वबळावर उतरणार
Independent Election Strategy
Independent Election StrategyPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीन पक्षात मैत्रीपूर्ण सामना पाहावयास मिळणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)

Independent Election Strategy
Municipal Elections Pune: मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी अपक्षांना करावी लागणार कसरत

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक गुरुवारी (दि. ६) मुंबईतील वरळी येथे झाली. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्यात आला. बैठकीस अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लडि, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राजू मिसाळ व पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी शहरातील निवडणुकीबाबतचा आढावा घेतला.

Independent Election Strategy
Pimpri Chinchwad Property Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर भरण्यास नागरिकांचा ऑनलाईन कल; तब्बल ₹५१५ कोटींचा भरणा

पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरची परिस्थिती सांगितली. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा सत्ता हातातून जाईल. भाजप किंवा शिवसेनेबरोबर युती करू नये, तसे केल्यास आपल्या उमेदवारावर अन्याय होईल, अशीही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

Independent Election Strategy
Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ५ लाख २२ हजार नवमतदार; कोणाच्या पारड्यात पडणार हा निर्णायक कौल?

अजित पवार म्हणाले की, महापालिका निवडणुकीची स्थानिक पातळीवरील पार्श्वभूमी पाहता, ही निवडणूक स्वबळावर लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा. पिंपरी-चिंचवडमध्ये आपण काम केले आहेत. सन २०१७ चा अपवाद वगळता, पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व राहिले आहे. त्यासाठी सर्वांनी काम करा. इतर पक्षांमध्ये दिल्लीला विचारावे लागते. मात्र, आपल्याकडे असे नाही. मागील वेळी काम केले नाही म्हणून कोण कोणाचा पत्ता कट होईल, असे काही होणार नाही. कुणावरही अन्याय होणार नाही. निवडणुकीवर माझे थेटपणे लक्ष असेल. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल.

Independent Election Strategy
Koregaon Park Land Row : कोरेगाव पार्क जमीन व्यवहारातील दस्तऐवज जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

दोन दिवसांत कार्यकारिणी जाहीर करणार

बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. त्यानंतर अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आता निवडणुकीसाठी मतदार याद्या पाहून घ्या, तयारी करा, सर्वानी एकजुटीने काम करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. शहराची विविध विभागांची कार्यकारिणी तयार केली आहे. त्यास मंजुरी दिली. दोन दिवसांत पक्षाची कार्यकारिणी जाहीर होईल, असे पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news