Koregaon Park Land Row : कोरेगाव पार्क जमीन व्यवहारातील दस्तऐवज जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

Parth Pawar Pune Land Deal : मुद्रांक शुल्कात सहा कोटींची तूट
Parth Pawar Land Row Koregaon Park Land Row
Published on
Updated on

parth pawar koregaon park land row pune police seize documents

पिंपरी : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीच्या खरेदी-विक्रीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी बावधन पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणी गुरुवार (दि. ६) गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवार (दि. ७) पोलिसांकडून पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच, पोलिसांनी संबंधित नोंदणी दस्तऐवज जप्त केले; मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

नेमका घोटाळा काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया एंटरप्रायजेस एलएलपी कंपनीने कोरेगाव पार्कमधील सुमारे ४० एकर महार वतनाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप आहे. या जमिनीची बाजारभावानुसार किंमत तब्बल १,८०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा व्यवहार उघड झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Parth Pawar Land Row Koregaon Park Land Row
Ajit Pawar : पुण्यातील जमिनीचा वादग्रस्त व्यवहार रद्द - अजित पवार

गुन्हा कोणाविरुद्ध?

या प्रकरणी अमिडिया एंटरप्रायजेसचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीचे कुलमुखत्यारधारक शीतल किशनसिंह तेजवानी आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सह जिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Parth Pawar Land Row Koregaon Park Land Row
Rahul Gandhi On Parth Pawar: 'मत चोरी'तून बनलेल्या सरकारची 'जमीन चोरी', राहुल गांधींनी पार्थ पवारांवरून थेट मोदींना घेरलं

मुद्रांक शुल्कात सहा कोटींची तूट

२० मे २०२५ रोजी या व्यवहाराचा खरेदीखत नोंदवण्यात आला. अशा प्रकारच्या व्यवहारासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते; तसेच सह जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार सुमारे सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणे बंधनकारक होते; मात्र आरोपींनी संगनमत करून हे शुल्क न भरता शासनाची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

Parth Pawar Land Row Koregaon Park Land Row
Eknath Khadse On Parth Pawar: 'ती' फाईल माझ्याकडे आली होती.... नवीन गौप्यस्फोट होतील; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

आवश्यक पुरावे मिळाल्यानंतर कारवाई

बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन पंचनामा केला व संबंधित कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांच्या आधारे अधिक तपास सुरू असून आवश्यक पुरावे मिळाल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पंचनामा करून दस्त जप्त करण्यात आला आहे. या दस्ताचा अभ्यास तसेच इतर पुरावे गोळा करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

- अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news