MSRTC Employees Social Media: ‘रील’ बनवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता प्रोत्साहन; ‘लालपरी’च्या योजनांच्या प्रचारासाठी होणार वापर

फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूबवर सक्रिय कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करणार; कर्तव्यावर असताना रील-व्हिडीओ बनविण्यास मात्र बंदी
ST bus service
ST bus servicepudhari photo
Published on
Updated on

पिंपरी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांकडून कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून व्हिडीओ, रील, अथवा सोशल मीडियावर कंटेंट तयार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनाकडून कारवाई केली जात होती; मात्र हा निर्णय महामंडळाने बदलला असून, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि यू-ट्यूबवर सक्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यामार्फत एस.टी.च्या योजना व उपक्रमांचा प्रचार केला जाणार आहे.

ST bus service
Pimpri Chinchwad Swine Flu: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा पुन्हा फैलाव; दोन दिवसांत ८ नवे रुग्ण

राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत एसटी प्रवाशांना सेवा देते. विविध सवलती आणि गोरगरिबाची जीवनवाहिनी अशी लालपरीची ओळख आहे. प्रवाससुविधा, विविध योजना, लोकाभिमुख उपक्रम, स्वच्छता मोहीम आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

ST bus service
Pimpri Public Safety Hazards: शहर सुशोभीकरणाच्या झगमगाटात सुरक्षेचा बोजवारा; पिंपरीत उघडी मॅनहोल, धोकादायक विद्युत पेट्या, झुकलेली झाडे

तसेच अधिकृत आशयाला प्राधान्य राहणार आहे. कर्तव्य बजावताना आगार बसस्थानक, कार्यालय अथवा बसमध्ये गणवेशात, रील, व्हिडीओ, लाइव्ह स्ट्रीमिंन किंवा अन्य सोशल मीडिया आशय तयार करण्यास बंदी आहे.

ST bus service
PCMC Health Inspector Jobs: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १३ आरोग्य निरीक्षकांची नोकरी धोक्यात; अनधिकृत संस्थेच्या प्रमाणपत्रावरून नियुक्तीचा पेच

अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास होणार मदत

सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माहिती अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि यूट्यूबवर सक्रिय आधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली माहिती संबंधित विभागाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ST bus service
Pimpri Chinchwad General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिका सभा आज; ‘नियमबद्ध की बेकायदा?’वरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

नियमावली काय ?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ( एसटी) ची गोपनीय, अंतर्गत किंवा प्रशासकीय माहिती , फोटो, व्हिडिओ अधिकृतपणे, प्रसारित करता येणार नाही. तसेच एसटी महामंडळाची प्रतिमा मालिन होईल किंवा चुकीचे संदेश जाईल असा आशयही टाळावा लागेल. अधिकृत प्रचारासाठी कंटेंट तयार करताना सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. नियमांचा भंग झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

१० ते १५ हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या कर्मचाऱ्यांचा इन्फ्लुएन्सर म्हणून विचार करण्यात येणार आहे.

रोहन देसाई , सहायक जनसंपर्क अधिकारी महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news