Moshi FDA Laboratory: मोशीतील एफडीएच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेला मुहूर्त कधी? ७३ उपकरणांचे नियोजन, प्रत्यक्ष काम रखडले

चार हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध; अन्न आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी पुणे-मुंबईला पाठविण्याची वेळ
FDA Laboratory
FDA LaboratoryPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मोशी येथील पुणे विभागीय कार्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही प्रयोगशाळा सुरू करण्याच्यादृष्टीने अद्याप ठोस हालचाली दिसत नसल्याने तिच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोशीतील एफडीए कार्यालयात चार हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध आहे. तरी तिच्या उभारणीबाबत पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडेही ठोस माहिती नाही. त्यामुळे नमुने तपासणीसाठी पुणे, मुंबईला पाठवावे लागत असल्याने अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागते.

FDA Laboratory
Pimpri Chinchwad Swachh Survekshan: स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचा डंका! स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमांकाची आज उत्सुकता

अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नपदार्थ आणि औषधांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. मात्र, पुणे विभागात स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने अन्नाचे नमुने पुण्यातील राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत, तर औषधांचे नमुने मुंबईतील 'एफडीए'च्या प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्यामुळे नमुन्यांची वाहतूक, तपासणी आणि अहवाल मिळण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो. परिणामी, संशयित अन्नपदार्थ किंवा औषधांच्या गुणवत्तेबाबत निष्कर्ष मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असते. स्थानिक पातळीवर प्रयोगशाळा सुरू झाल्यास नमुन्यांच्या तपासणी प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

FDA Laboratory
Pimpri Chinchwad Diwali Fire Incidents: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या आतषबाजीचा भडका! अवघ्या २४ तासांत आगीच्या ७६ घटना

आयुक्तांच्या पाहणीनंतर प्रयोगशाळेबाबत चर्चा

अन्न व औषध प्रशासनाच्या, पुणे विभागीय कार्यालयात प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा झाल्यानंतर तिच्या प्रत्यक्ष कामकाजाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, अद्याप प्रयोगशाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोशी येथील पुणे विभागीय कार्यालयाची पाहणी केली. या वेळी प्रयोगशाळेच्या निर्मितीबाबत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

FDA Laboratory
Cyber Fraud Gold Purchase: सायबर चोरट्यांचा सराफांना फटका! यूपीआयद्वारे सोने खरेदी करून लुबाडलेली रक्कम लपविण्याचा नवा फंडा

निर्णय आयुक्त कार्यालयातून होणार

प्रयोगशाळेच्या उभारणीसंदर्भातील पुढील कार्यवाही आयुक्त कार्यालयातून होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध असतानाही प्रयोगशाळेचे काम कधी सुरू होणार, उपकरणांची व्यवस्था कधी होणार आणि प्रत्यक्ष नमुना तपासणीला कधी सुरुवात होणार, याबाबत अद्याप निश्चित कालमर्यादा समोर आलेली नाही.

FDA Laboratory
Nashik Phata Road Potholes: नाशिक फाटा चौकात खड्ड्यांची ‘मलमपट्टी’! सिमेंटचे गट्टू टाकल्याने वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका

७३ अत्याधुनिक उपकरणे

मोशी येथील प्रयोगशाळेत अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी ३८, तर औषधांच्या तपासणीसाठी ३५ उपकरणे बसविण्याचे नियोजन आहे. या प्रयोगशाळेत अन्नपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेची तपासणी करता येणार आहे. तसेच, प्रयोगशाळेच्या परिसरात प्रशिक्षण केंद्र आणि स्वतंत्र गोदामाची सुविधाही प्रस्तावित आहे. मात्र, या उपकरणांच्या खरेदीसाठी किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्ष किती खर्च झाला आणि किती उपकरणे उपलब्ध झाली आहेत, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्रयोगशाळेचे प्रत्यक्ष कामकाज कधी सुरू होईल, हे सध्या आम्हाला सांगता येणार नाही. कारण हे निर्णय मुंबईतील मुख्य कार्यालयातून घेतले जातात.

गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.