MNGL Gas Pipeline Delay: मोशी-चिखलीत एमएनजीएल गॅस पाईपलाईन रखडली; नागरिकांना सिलिंडरची झळ

चार वर्षांपासून जोडणीच नाही; अर्धवट कामामुळे नागरिकांचा संताप, प्रशासनाकडून लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन
Gas Pipeline
Gas PipelinePudhari
Published on
Updated on

मनीषा थोरात

मोशी: शहरात एलपीजी गॅसला पर्याय म्हणून महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) वतीने भूमिगत वाहिनीचे जाळे विस्तारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, चिखली आणि मोशी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये हे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Gas Pipeline
Lonavala Encroachment Case: तुंगार्ली हिल परिसरातील ओढ्यावर अतिक्रमणाचा प्रयत्न हाणून पाडला; नगर परिषदेची कारवाई

विशेष म्हणजे, अनेक सोसायट्यांच्या अंतर्गत भागात पाईपलाईन टाकून चार वर्षे उलटली तरी मुख्य वाहिनीशी जोडणी न झाल्याने या वाहिन्या केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत. यामुळे आजच्या गॅसटंचाईच्या काळातही नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत असून, सिलिंडरसाठी रांगा लावण्याची वेळ आली आहे. चिखली-मोशी परिसरातील रहिवाशांच्या मते, एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणीचे कारण सांगून केवळ वेळकाढूपणा केला जात आहे.

Gas Pipeline
PCMC School Uniform Scheme: पीसीएमसी शाळांमध्ये गणवेश खरेदी तातडीने सुरू करा; विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा

अनेक ठिकाणी खोदकाम करून इमारतींच्या परिसरात गॅस वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, परंतु मुख्य वाहिनीचा पुरवठा अद्याप जोडलेला नाही. चिखली परिसरातील कृष्णानगर, पाटीलनगर यांसारख्या भागांत ड्रेनेज आणि रस्त्यांच्या कामांमुळे आधीच रस्ते उखडलेले असताना, गॅस वाहिनीच्या अर्धवट कामामुळे पदपथाचीही दुरवस्था झाली आहे. पावसामुळे या कामात अधिक अडथळे येत असून, खोदलेल्या ठिकाणी राडारोडा तसाच पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मोशीतील काही सोसायट्यांमध्ये 70 ते 80 टक्के घरांपर्यंत गॅस पोहोचला असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, अद्याप 30 टक्क्यांहून अधिक कुटुंब या सुविधेपासून वंचित आहेत.

Gas Pipeline
PCMC Drainage Problem: उघडी गटारे, तुटलेली झाकणे; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धोका वाढला

पालिकेच्या कामांमुळे कामात अडथळा

चिखली-मोशी भागातील जवळपास 60 ते 70 टक्के कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी महापालिकेची विकासकामे सुरू असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे एमएनजीएल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या दीड-दोन महिन्यांत या कामाला गती देऊन प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन जिथे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तिथे दुरुस्तीचे कामही लवकरच हाती घेतले जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Gas Pipeline
PCMC Water Supply Action: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पीसीएमसीची कारवाई; 23 मोटारपंप जप्त

आजच्या गॅसटंचाईचा नागरिकांना त्रास झाला नसता जर वेळेत जोडणीकामे झाली असती, तर या कामासाठी आमचाही पाठपुरावा सुरू आहे. काही ठिकाणी खोदकामे केली आहेत. काही ठिकाणी लाईन पूर्ण झाली; मात्र मुख्य लाईन जोडली नसल्याने गॅसपुरवठा नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. मोजक्याच ठिकाणी म्हणजेच स्पाईन सिटी, प्रभाग 6 मोशी प्राधिकरण ठिकाणी कामकाज झाल्याचे दिसते, पण बाकी ठिकाणी कामे रखडलेली आहेत. लवकरात-लवकर ही कामे मार्गी लागणे आवश्यक आहे.

सुजाता बोराटे, नगरसेविका

गेल्या 4 वर्षांपासून आम्ही गॅस पाईपलाईनच्या प्रतीक्षेत आहोत. सोसायट्यांत पाईपलाईन टाकून 4 वर्षे झाली. मात्र, मुख्य वाहिनी नसल्याने ही केवळ शोभेची वस्तू झाली आहे. प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रतिभा चौधरी, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news