Maval Prostitution Issue: मावळ तालुक्यात महामार्गावर वेश्याव्यवसायाचा आरोप; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

मुंबई-पुणे महामार्ग व तळेगाव एमआयडीसी परिसरात खुलेआम प्रकार सुरू असल्याचा दावा
Prostitution
ProstitutionPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: सोन्याचा तुकडा म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यात विशेषतः मुंबई-पुणे महामार्गावर व तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू आहे. या भागातील लॉजिंग व्यवसायही अनधिकृतपणे सुरू आहे. उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराचा मावळातील तरुण पिढीवर विपरीत परिणाम होऊ लागला असून, पोलिस प्रशासन का गप्प आहे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Prostitution
E Challan Portal Issue: ई-चलान पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दंड भरूनही अपडेट होत नसल्याने नागरिक त्रस्त

पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबई या महानगरांच्या मध्यावर असलेला मावळ तालुका सोन्याचा तुकडा म्हणून ओळखला जात आहे. नैसर्गिक देणगी असलेल्या मावळ तालुक्यात वाढत असलेला पर्यटन व्यवसाय, औद्योगिकीकरण या बरोबरच मोठ्या शिक्षणसंस्थांमुळे अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले असून, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यांतून नागरिक मोठ्या संख्येने मावळ तालुक्यात रोजगार व वास्तव्यासाठी येत आहेत. त्यामुळे एका बाजूला मावळ तालुक्यात उद्योग व्यवसाय, रोजगार, शैक्षणिक सुविधा, पर्यटन वाढत असताना दुसरीकडे दारू आणि अमलीपदार्थांच्या अवैध विक्रीबरोबरच आता वेश्याव्यवसायही खुलेआम सुरू असल्याने विशेषतः तरुण पिढी भरकटत चालली असून, गुन्हेगारीही वाढत चालली आहे.

Prostitution
Dehu Yelwadi Road Project: देहू-येलवाडी रस्ता रुंदीकरणाला वेग; अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

अनधिकृत लॉजिंग सुरू

ज्या ठिकाणी संबंधित महिला उभ्या असतात, त्या भागातील जवळपास असणाऱ्या लॉजवर हा वेश्याव्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. कुठल्याही ओळखपत्राची शहानिशा न करता किंवा कुठलीही विचारपूस न करता संबंधित महिलांसह आलेल्या ग््रााहकाला सहज लॉज उपलब्ध करून दिला जातो. लॉजिंगच्या या व्यवसायावर कोणाचेही नियंत्रण नाही हेही विशेष आहे.

तरुण पिढीचे भवितव्य अंधारात

दारू आणि अमलीपदार्थांच्या अवैध विक्रीपाठोपाठ मावळ तालुक्यात सुरू असलेली हा वेश्याव्यवसाय तालुक्यातील तरुण पिढीला वाम मार्गाला लागण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरू शकतो. याशिवाय अनधिकृतपणे सुरू असलेल्या अशा व्यवसायांमुळे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढण्याची चिन्हे असून, याच व्यवसायातून भविष्यात एखाद्या लॉजवर भयंकर घटना घडू शकते. परंतु, हे सगळे खुलेआम सुरू असताना पोलिस प्रशासन का गप्प आहे, हा मोठा प्रश्न आहे.

Prostitution
Adhik Maas Tradition: अधिकमासामुळे जावयाच्या वाणाची परंपरा उत्साहात; बाजारात अनारसे-चांदीच्या वस्तूंना मागणी

संबंधित महिला व लॉजचालकांचे लागेबांधे

रस्त्यावर उभ्या असलेल्या संबंधित महिला व ग््रााहक यांचा व्यवहार ठरला की त्याच्याच गाडीवर बसतात व गाडी थेट लॉजवर जाते. तिथे कुठलीही शहानिशा न करता ग््रााहकाला लॉजमध्ये प्रवेश दिला जातो. साधारणतः दोन तासाला 300 ते 500 रुपये लॉजचा दर आकाराला जातो. अशा प्रकारचे लागेबांधे असल्याने लॉजिंगचालकांनी सहज ग््रााहक मिळत असल्याने लॉजिंग व्यवसायही तेजीत असल्याचे दिसते.

पोलिस ठाण्याच्या हद्दीचा घेताहेत फायदा!

वडगाव मावळ व तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याची हद्द वडगाव - तळेगाव फाटा येथील सीआरपीएफ कॅम्प व लिटाका कंपनी येथून सुरू होते. त्यामुळे नेमकी हद्द कोणाची हा प्रश्न असून, याचाच फायदा संबंधित महिला घेत आहेत. याच ठिकाणी मोठ्या संख्येने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात, त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीचा फायदा अचूकपणे घेतला जात असल्याचे दिसते.

Prostitution
Pimpri Chinchwad Scam: पिंपरी-चिंचवड 60 कोटी घोटाळा; अहवालावर प्रश्नचिन्ह, एकाच अधिकाऱ्यावर ठपका

..या ठिकाणी असतात वेश्या

मुंबई-पुणे महामार्गावर भरदिवसा आणि मध्यरात्रीपर्यंत प्रामुख्याने सोमाटणे टोलनाका, तळेगाव दाभाडे येथे आय. बी. पी. पेट्रोल पंपाच्या पुढे, सीआरपीएफ कॅम्प समोर, कान्हे फाटा येथे रामकृष्ण हरी मंगल कार्यालयाजवळ, साईबाबा सेवाधाम समोर अशा विविध ठिकाणी महामार्गावरच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला भरदिवसा उभ्या असतात. याशिवाय, तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरसुद्धा ठिकठिकाणी अशाप्रकारे वेश्याव्यवसाय सुरू असून भररस्त्यावर तोंड बांधून उभ्या असणाऱ्या या महिलांमुळे रस्त्याने पायी जाणाऱ्या किंवा काही कारणास्तव उभा असणाऱ्या स्थानिक किंवा प्रवासी महिलांकडेही नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून, यामुळे अशा महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा!

खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाकडे लोकप्रतिनिधीही कानाडोळा करत आहेत. तालुक्यात नुकत्याच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच त्यापूर्वी नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या माध्यमातून प्रत्येक शहरात व ग््राामीण भागात नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी तयार झाले आहेत. परंतु, आजतागायत एकही लोकप्रतिनिधीने याबाबत साधा शब्दही काढलेला दिसत नाही. इतकेच नाही, तर यामध्ये महिला लोक प्रतिनिधीही कधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे या गैरप्रकारांकडे लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा होत असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news