Bhosari Drone Cluster: भोसरी एमआयडीसीत ड्रोन क्लस्टरला वेग; 40 कंपन्यांची गुंतवणुकीस उत्सुकता

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला एआय-आधारित तांत्रिक बूस्ट; 2026 मध्ये प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे लक्ष्य
Bhosari Drone Cluster
Bhosari Drone ClusterPudhari
Published on
Updated on

पंकज खोले

पिंपरी : औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता अध्याधुनिक तांत्रिक जोड मिळणार आहे. सूक्ष्म व मध्यम कंपन्या, वाहन उद्योग आणि उत्पादन क्षेत्राशी निगडित असलेल्या भोसरी एमआयडीसीत ड्रोन क्लस्टरच्या उभारणीला वेग आला असून, भविष्यात तांत्रिक आणि एआयच्या धर्तीवर भोसरीत मोठ्या गुंतवणुकीस चालना मिळणार आहे. नुकत्याच 40 कंपन्यांनी यासाठी इच्छा व्यक्त केली असून, 14 कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी केली आहे.

Bhosari Drone Cluster
Pimpri Chinchwad Scholarship Exam: पिंपरी-चिंचवडमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १५,५०७ विद्यार्थी सज्ज

पुण्यात नवे दोन क्लस्टर उभारण्यासाठी राज्य सरकाराच्या उद्योग मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरने अर्थात एमसीसीआयएने पुढाकार घेतला आहे. त्यापैकी ड्रोन आणि खाद्यपदार्थ असे दोन क्लस्टर असतील. त्यासाठी भोसरी आणि हडपसर या दोन ठिकाणांची निवड करण्यात आली होती. प्रत्यक्षात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे यासाठी जागाची चाचपणी केल्यानंतर हे दोन पर्याय समोर आले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक वातावरण आणि पायाभूत सुविधांचा विचार केल्यानंतर भोसरीत ड्रोन क्लस्टर आणि हडपसर या ठिकाणी फुड क्लस्टर उभारण्याची चाचपणी सुरू झाली आहे.

Bhosari Drone Cluster
PCMC Accepted Corporator Rule Change: नवी मुंबईच्या निर्णयानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक नियम बदलणार?

या दोन्ही क्लस्टरच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 200 सूक्ष्म, लघु उद्योजकांना फायदा होणार आहे. त्यासोबतच पूरक उद्योगांना चाचणी सुविधा, संशोध आणि विकास, बाजारपेठेत विक्रीपूर्वी सुरुवातीची उत्पादन सुविधा उपलब्ध होईल. यामुळे सध्या तांत्रिक क्षेत्रात असलेल्या व येऊ घातलेल्या नव्या उद्योजकांना मोठे पाठबळ मिळणर आहे.

सध्या आयटी क्षेत्राबरोबरच, संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे कामाची गती आणि वेळही वाचत आहे. सरकारी कार्यालयातही याचा वापर अलीकडे वाढत आहे. त्यामुळे राज्यातील ड्रोन उद्योगांना चालना मिळणार आहे.

Bhosari Drone Cluster
Lonavala Monsoon Tourism Planning: लोणावळ्यात पावसाळी पर्यटन बंदीपूर्वी नियोजन बैठकीची मागणी

काय आहे ड्रोन क्लस्टर?

ड्रोन क्लस्टर म्हणजे ड्रोन आणि त्यांच्या सुट्या भांगासाठी आवश्यक असे आरेखन, संशोधन, चाचणी आणि त्यासंबंधित तंत्रज्ञानाशी निगडित उद्योगांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध होईल. यामुळे जागेचा खर्च वाचवून जास्तीत जास्त रक्कम यंत्रसामग्री व सॉफ्टवेअरमध्ये गुंतवता यावी, यासाठी पिंपरीतील औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.\

Bhosari Drone Cluster
Lonavala Land Fraud Case: कुरवंडे येथील ५३ एकर जमिनीवर बनावट कागदपत्रांचा प्रकार; ९ जणांवर गुन्हा

सध्याची स्थिती

भोसरी येथील औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर एकाच ठिकाणी सामायिक सांडपाणी केंद्र प्रस्तावित आहे. दरम्यान, त्या nजागेसाठी पुन्हा मुदतवाढ संबंधित विभागाने एमआयडीसी मागितली असतानाच आता ही जागा ड्रोन क्लस्टरसाठी एमसीसीसीने त्या जागेची एमआयडीसीकडे मागणी केली आहे. 20 गुंठे जागेची मागणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात, 6 हजार स्क्वेअर मीटर अर्थात 6 गुंठे जागा देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा सीईटीपीची जागा 6 गुंठेची जागेची पुन्हा मागणी केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

Bhosari Drone Cluster
Purandar Airport Project: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती; भूसंपादनासाठी ₹6 हजार कोटींच्या कर्जास मंजुरी

या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रे आणि डाटा गोळा केला आहे. तो राज्य शासनाच्या उद्योग विभागाकडे पाठविण्यात आला आहे. याच वर्षी म्हणजेच 2026 मध्ये हा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर

Bhosari Drone Cluster
PMRDA River Improvement Project: इंद्रायणी-पवना नदी सुधार प्रकल्पासाठी लवकरच निविदा; 27 गावांसाठी ₹976 कोटींचा एसटीपी उपक्रम

भोसरीच का?

ड्रोनची चाचणी घेण्यासाठी तसेच, तयारीसाठी मोकळी जागा लागते. तसेच, प्रयोगशाळादेखील असणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक म्हणून ही जागा निश्चित होईल. वाहतूक हब, इलेक्ट्रीक कंपन्या असल्याने ड्रोनसाठी हा पर्याय पुढे आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news